Pralhad Joshi New Education Minister| धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांची शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती

नीट पेपर फूटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी दिला होता राजीनामा, केंद्र सरकारने उचलली तातडीची पावले
Pralhad Joshi New Education Minister
Pralhad Joshi New Education Minister
Published on
Updated on

Pralhad Joshi New Education Minister नीट पेपर फूटीप्रकरणी दिल्ली येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारवर देशभरातून मोठा दबाव वाढला होता. या आंदोलकर्त्यांची प्रमुख मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फूटी प्रकरणाची नैतीक जबाबदारी घेऊन राजिनामा द्यावा. त्‍यानुसार आज दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला. प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती कार्यालयाने स्वीकारला. त्‍यानंतर आज लगेचच घडामोडी होऊन प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.

आज दिल्ली येथे झालेल्या घडामोडी नंतर प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती कार्यालयाने स्वीकारला त्‍यानंतर सांयकाळी पंतप्रधान मोदी यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान पोर्टफोलिओव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. जोशी सध्या केंद्रात मंत्री आहेत.

दरम्यान प्रल्हाद जोशी यांनी कालच या आंदोलनासंदर्भात भाष्य केले होते ते म्हणाले होते की सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच त्‍यांनी CJP-नेतृत्वाखालील आंदोलनाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या "असामाजिक घटकांवर" आरोप केला होता. त्‍यांनतर आज केंद्र स्तरावर मोठ्या घडामोडी होऊन संध्याकाळी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कर्नाटकचे प्रतिनिधीत्‍व करणारे प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या एनडीए सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रीपदाचा कार्यभार आहे. आता त्‍यांच्याकडे शिक्षणमंत्रीपदाचा अतिरीक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news