ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन; पंतप्रधान मोदींकडून स्टार्मर यांचे अभिनंदन

लेबर पक्षाला ६५० पैकी ४०० पेक्षा अधिक जागा
PM Narendra Modi
लेबर पक्षाच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पक्षाचे नेते कीअर स्टार्मर यांचे अभिनंदन केले. File Photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ब्रिटनमध्ये १४ वर्षांनंतर लेबर पक्षाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात लेबर पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. लेबर पक्षाच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते कीअर स्टार्मर यांचे अभिनंदन केले. लेबर पक्षाने आतापर्यंत ६५० पैकी ४०० पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. निवडणुकीदरम्यान मजूर पक्षाचे नेतृत्व करणारे कीअर स्टार्मर हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान असण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi
भारत-ब्रिटन ऐतिहासिक पाऊल टाकतील?

Summary

  • ब्रिटनमध्ये १४ वर्षांनंतर लेबर पक्षाची पुन्हा सत्ता

  • लेबर पक्षाने आतापर्यंत ६५० पैकी ४०० पेक्षा अधिक जागा मिळवल्या

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे नेते कीअर स्टार्मर यांचे अभिनंदन

PM Narendra Modi
Samir Shah BBC | अभिमानास्पद! ब्रिटन PM नंतर, BBC अध्यक्षपदी भारतीय वंशाचे ‘समीर शहा’

पंतप्रधान ऋषी सुनक यांचेही पंतप्रधान मोदींनी मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सद्वारे कीअर स्टार्मर यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी एक्सद्वारे लिहीले की, “कीअर स्टार्मर यांचे यूकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उल्लेखनीय विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्व क्षेत्रांमध्ये भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, परस्पर विकास आणि समृद्धी वाढवण्यासाठी मी आपल्या सकारात्मक आणि रचनात्मक सहकार्याची अपेक्षा करतो,” असेही पंतप्रधान मोदींनी लिहीले आहे. यासोबतच ब्रिटनचे मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांचेही पंतप्रधान मोदींनी एक्सवरुन आभार मानले आहेत. त्यांनी लिहीले की, “ऋषी सुनक यांच्या प्रशंसनीय नेतृत्वासाठी आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भारत -ब्रिटन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. ऋषी सुनक यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत भारत बनला जगातील 5 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश

दरम्यान, यापुर्वी ब्रिटनमध्ये २०२२ पासून कंझर्व्हेटिव्ह पक्षाची सत्ता होती. या सरकारचे नेतृत्व ऋषी सुनक यांच्याकडे होते. शुक्रवारी निवडणूक निकालानंतर ऋषी सुनक यांनी राजा चार्ल्स यांच्याकडे राजीनामा दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news