America Iran war | अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली

यूएसकडून मध्यपूर्वेत 50 हून अधिक लढाऊ विमाने तैनात
America Iran war |
America Iran war | अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात जिनिव्हामध्ये नुकत्याच पार पडलेल्या अणुचर्चांमध्ये प्रगती झाल्याचे दोन्ही बाजूंनी सांगितले असले, तरी तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. चर्चेनंतर अमेरिकन लष्कराने मध्यपूर्वेत 50 हून अधिक लढाऊ विमाने तैनात केली आहेत. हा लष्करी हालचालींचा निर्णय वॉशिंग्टनची कठोर भूमिका दर्शवणारा मानला जात आहे. त्यामुळे युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहे.

अधिकार्‍यांच्या मते, दोन्ही देशांनी चर्चेचा पुढील टप्पा गाठण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांवर प्राथमिक सहमती दर्शवली आहे. मात्र, अंतिम करारापर्यंतचा प्रवास कठीण आणि तपशीलवार असेल, असे इराणी नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने सुरुवातीपासूनच स्पष्ट केले आहे की, इराणने अण्वस्त्र विकसित करू नये, हीच त्यांची ‘रेड लाईन’ आहे. इस्रायलसोबतच्या 12 दिवसांच्या संघर्षानंतर आणि इराणमधील आंदोलकांवरील कारवाईनंतर हा मुद्दा अधिक संवेदनशील झाला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी सांगितले की, चर्चा सकारात्मक दिशेने गेली असली तरी इराण अजून अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास तयार दिसत नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखून दिलेल्या मर्यादा इराण मान्य करत नसल्याचे दिसते.

रशिया-इराण संयुक्तसराव

रशिया आणि इराण गुरुवारी ओमान समुद्र व हिंदी महासागरात संयुक्त नौदल सराव करणार आहेत. या सरावाचा उद्देश सागरी सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या कारवायांविरोधात समन्वय वाढवणे असल्याचे इराणी अधिकार्‍यांनी सांगितले.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद; जागतिक बाजारपेठेत खळबळ

या पार्श्वभूमीवर इराणनथेट गोळीबार सरावासाठी होर्मुझ सामुद्रधुनी तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली. ही सामुद्रधुनी जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची असून, जगातील सुमारे 20 टक्के कच्चे तेल या मार्गे वाहून नेले जाते. अमेरिकेने मध्यपूर्वेत लष्करी साधने वाढवल्यानंतर प्रथमच इराणने अशी घोषणा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news