POSCO कायदा | अल्पवयीन मुलांच्या संबंधात होतोय गैरवापर - उच्च न्यायालय

'सहमतीचे संबंध आणि अत्याचार यात फरक करणे महत्त्वाचे'
POSCO Act
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलाहबाद उच्च न्यायलयाने Protection of Children From Sexual Offenses (POSCO) कायद्याचा गैरवापर होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. अल्पवयीन जोडपी परस्पर सहमतीने रोमँटिक रिलेशनमध्ये असतात, त्यांच्याविरोधात या कायद्याचा गैरवापर होत आहे, असे न्यायमूर्ती कृष्णा पहल यांनी म्हटले आहे.

अत्याचार आणि समतीचे सबंध यामध्ये फरक करणे मोठे आव्हान

लैंगिक अत्याचाराचे खरे प्रकार आणि सहमतीचे संबंध यातील फरक करता येणे हे खरे आव्हान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. योग्य न्यायदान व्हावे यासाठी या प्रकरणांची काळजीपूर्वक हातळणी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

परंतु, या नात्यात कायद्याचा गैरवापर

ते म्हणाले, "या कायद्याच्या वापराबद्दल न्यायालयाने वेळोवेळी चिंता व्यक्ती केली आहे. १८ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा लैंगिक छळपासून संरक्षण करणे हा या कायद्याचा हेतू आहे. पण या कायद्याचा गैरवापर अल्पवयीन मुले सहमतीने रोमँटिक नातेसंबंधात आहेत, त्यांच्या विरोधात होत आहे."

अटकेतील अल्पवयीन आरोपीला जामीन

POSCO कायद्यानुसार अटकेत असलेल्या आरोपीला जामीन देताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या प्रकरणातील आरोपी सतिश याने आपल्या अल्पवयीन मुलीला भूरळ पाडून संबंध ठेवले होते, असा आरोप वडिलांनी केला होता.

जन्मलेल्या मुलांच्या नावे दोन लाख रुपये ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

सतीशच्या वकिलांनी न्यायालयात हा आरोप खोटा असल्याचे सांगितले. या प्रकरणातील मुलीची या संबंधांना सहमती होती, तसेच तिचे वय १८ होते असा दावा केला. दोघे प्रेमसंबंधात होते आणि एका मंदिरात लग्नही केले होते. ज्या वेळी या तरुणाविरोधात गुन्हा नोंद झाला तेव्हा ती गरोदर होती. या प्रकरणात न्यायमूर्तींनी संबंधित आरोपीला जामीन मंजूर केला. तसेच या तरुणाला जन्माला आलेल्या मुलाच्या नावे दोन लाख रुपयांची ठेव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news