संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल

Rahul Gandhi | आता संसदेत आणि प्रवेश द्वारावर निदर्शने करता येणार नाही
Rahul Gandhi
संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखलPudhari File Photo
Published on
Updated on

दिल्ली :

संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत.

संसदेत आणि संसद बाहेर निदर्शन करणाऱ्या खासदार विरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणा-या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केलीय. शिवाय कोणताही खासदाराला अडवणूक करता येणार नसल्याचा आदेशही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलन केलं जाईल की अध्यक्षांनी घालून दिलेले नियम पाळले जाईल हे पहावं लागणार आहे.

पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर कलम ११७ः जाणून बुजून दुखापत पोहोचवणे, कलम ११५ः दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, कलम ३ (५): सामुहिक पणे गुन्हा करणे, कलम १२५ः खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे, कलम १३१ः धक्का देणे आणि भिती घालणे, कलम ३५१ः धमकी देणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news