'परीक्षा पे चर्चा' नव्या स्वरुपात! PM मोदींसह दीपिका पदुकोण आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सहभाग

Pariksha Pe Charcha | यंदा साडेतीन कोटी विद्यार्थ्यांची नोंदणी
Pariksha Pe Charcha
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमातून संवाद साधतात.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून संवाद साधतात. गेल्या आठ वर्षांपासून 'परीक्षा पे चर्चा' हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांतर्गत पीएम मोदी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअरच्या वाटेवर महत्त्वाच्या असणार्‍या या परीक्षेमधील यशासाठी तसेच तणावमुक्त राहण्यासाठी एकंदरीतच अभ्यासाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात.

Pariksha Pe Charcha | 'या' दिग्गजांचा सहभाग

आता पीएम मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' हा संवाद कार्यक्रम यावर्षी नवीन स्वरूपात आणि शैलीत आयोजित केला जात आहे. यावर्षी 'परीक्षा पे चर्चा'मध्ये पीएम मोदींसह बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), बॉक्सर मेरी कोम, अवनी लेखारा, ऋजुता दिवेकर, सोनाली सभरवाल, फूडफार्मर, विक्रांत मेस्सी, भूमी पेडणेकर, टेक्निकल गुरुजी आणि राधिका गुप्ता आदी विविध क्षेत्रातील दिग्गज सहभागी होत आहेत. ते विद्यार्थ्यांना टिप्स देतील.

'परीक्षा पे चर्चा'चे यंदाचे आठवे वर्षे

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे हे आठवे वर्षे आहे. या वर्षी तीन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम राष्ट्रीय दिल्लीतील भारत मंडपम येथे टाउन हॉल स्वरूपात आयोजित केला जातो.

यंदा साडेतीन कोटी विद्यार्थ्यांची नोंदणी

२०१८ मध्ये 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. यंदा २०२५ मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल ३.५६ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सातव्या आवृत्तीपेक्षा यंदा होणाऱ्या आठव्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी यासाठी २.२६ कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हा कार्यक्रम पहिली तीन वर्षे नवी दिल्ली येथे टाउन-हॉल इंटरॅक्टिव्ह स्वरूपात आयोजित केला होता. कोरोना काळात चौथा कार्यक्रम दूरदर्शन आणि सर्व प्रमुख टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात ऑनलाइन आयोजित केला होता.

Pariksha Pe Charcha
कॉलेजनंतर काय ठरवलंय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news