PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi|हा मणिपूरच्या लोकांचा अपमान : पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरुन काँग्रेसचे टिकास्‍त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबरला मणिपूर दौऱ्यावर : हिंसाचाराच्या घटनेनंतर २९ महिन्यांनी दौरा
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत. मणिपूरमधील हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्याचा अधिकृत तपशील जाहीर झाला नसला तरी स्थानिक पातळीवर तयारी सुरू झाली आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर काँग्रेसने टीका केली आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi Japan visit | सार्‍या जगाच्या भारतावर आशा

मागील अडीच वर्ष मणिपूर धुमसत आहे. दरम्यान, मणिपूर अशांततेचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला होता. विरोधी पक्षांनी सातत्याने पंतप्रधान मोदी मणिपूरला कधी जातील, यावर विचारणा केली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान या दौऱ्यामध्ये मणिपूरसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

PM Narendra Modi
मणिपूर नव्या वळणावर

हा मणिपूरच्या लोकांचा अपमान, काँग्रेसची टीका

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर मात्र काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे. २९ महिन्यांनंतर पंतप्रधान मणिपूर भेटीत फक्त ३ तास घालवणार आहेत. हा मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान मोदी राज्यात फक्त ३ तास घालवतील. इतक्या घाईघाईत केलेल्या या भेटीतून त्यांना काय साध्य होण्याची अपेक्षा आहे? हा प्रत्यक्षात राज्यातील लोकांचा अपमान आहे, त्यांनी २९ महिने त्यांची वाट पाहिली आहे, असेही रमेश म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news