PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या इराणच्या राष्ट्रपतींना ईदच्या शुभेच्छा

संवाद साधत प्रादेशिक शांतता आणि सागरी सुरक्षेवर केली चर्चा, पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवला
pm modi
pm modifile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी चर्चा केली. तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावरही भर दिला. ईद निमित्ताने, पंतप्रधानांनी, डॉ. मसूद पेझेश्कियान यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी झालेल्या चर्चेत, दोन्ही नेत्यांनी, हा उत्सवाचा काळ पश्चिम आशियात, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी घेऊन येणारा ठरेल, अशी आशा व्यक्त केली. या प्रदेशातील महत्वाच्या पायाभूत सुविधांवर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत, पंतप्रधान मोदी यांनी, असे हल्ले प्रादेशिक स्थैर्य राखण्यात धोकादायक ठरून, महत्वाच्या जागतिक पुरवठा साखळीतही अडथळे निर्माण करत असल्याचे सांगितले. 

जागतिक स्तरावर सुरळीत नौवहनाचे स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे असल्याचा पुनरुच्चार करत, आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूकीचे मार्ग खुले आणि सुरक्षित राहतील, हे सुनिश्चित करणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेची काळजी घेत असल्याबद्दल, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इराणचे आभारही मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news