

PM Modi Live : नवरात्रीची पहिली पहाट ही जीएसटी कपातीने होणार आहे. या सुधारानेमुळे देशातील सर्वसामान्याना बचतीची नवी संधी निर्माण होणार आहे. देशात नवरात्रोत्सवाबरोबरच बचत उत्सवही सुरू होईल.’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी (दि. २१) राष्ट्राल संबोधित करताना केली.
पूर्वी देशातील कर प्रणाली अत्यंत असंतुलीत होती. मात्र, आम्ही जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला चालना दिली. आता जीएसटीमध्ये कपात करत आर्थिक प्रगतीचा वेग आणखीन वाढवला आहे. हा निर्णय भारताच्या आत्मनिर्भतेला चालना देणारा ठरणार आहे. या निर्णयाने देशातील सर्व राज्यांच्या विकासाला लक्षणीय चालना मिळणार आहे. जीएसटी बचत उत्सवाने छोट्या व्यापा-यांसह तरुणाईला याचा लाभ होणार आहे. एक देश एक कर हे स्वप्न आपले आता साकरले आहे. देशात गुंतवणूकीची मोठी संधी निर्माण होणार आहे.’ असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्याने देशातील 99 टक्के वस्तूंवर केवळ 5 टक्केच कर आकारला जाणार आहे. यामुळे दैनंदिन वस्तू खरेदी करण्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. या कर सुधारणेचा देशातील सर्वच घटकांना लाभ होणार आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतीलच त्याचबरोबर टीव्ही, एसी, कार, ईलेक्ट्रीक स्कुटर यांच्यावरील कर कमी झाल्याने मध्यमवर्गियांना फायदा होणार आहे. आता ख-या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. आम्ही एक राष्ट्र एक कर याचे वचन दिले होते, ते आज साकारले आहे.
जीएसटी सुधारणेचा मोठा लाभ लघू, कुटीर, सुक्ष्म उद्योगांना मिळणार आहे. आता भारताच निर्मिती आणि भारतातच विक्री हे चक्र वेगाने फिरणार आहे. नागरिक देवो भव: हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. जीएसटी सुधारणा करण्याचा निर्णय देशाला आत्मनिर्भर करण्यासाठीचे मोठे पाऊल आहे.
आज आपल्या दैनंदिन वापरात अनेक गोष्टी या विदेशी आहेत. आपल्याला याची जाणीवही नसते. मात्र आता पुन्ह एकदा आपल्याला स्वदेशीचा नारा द्यावा लागेल. मी स्वदेशात तयार झालेल्या वस्तूच वापरतो असे आपल्या अभिमानाने सांगावे लागेल. तरच देशातील लघू, लघू, कुटीर, सुक्ष्म उद्योगांना चालना मिळेल. देशातील प्रत्येक राज्याचा विकास होईल, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी मेड इन इंडियाचा निर्धार केला.
बचत महोत्सवामुळे प्रत्येक नागरिकाचे पैसे वाचतील. जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. प्रत्येक घरात आनंद पसरेल. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. ‘एक राष्ट्र, एक कर’चे स्वप्न साकार होईल. कर चक्रव्यूह एक समस्या होती, परंतु जीएसटी सुधारणांमुळे सर्वकाही सोपे झाले आहे.