PM मोदींची राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन यांच्‍याशी रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा

शांततेसाठीच्‍या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार
Narendra Modi
रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युक्रेन दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक देशांच्या राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांशी चर्चा करत आहेत. आज (दि.२७) त्‍यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षाबाबत त्यांनी आपले मत व्यक्त मांडले. या चर्चेची माहिती त्‍यांनी X पोस्‍टच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे. रशिया-युक्रेन संघर्ष आणि नुकत्याच झालेल्या युक्रेन भेटीबद्दल चर्चा केली. यावेळी त्‍यांनी चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या वेळी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. बांगलादेशातील अल्पसंख्याकांची परिस्थिती आणि युक्रेनमधील परिस्थिती यावर झालेली चर्चा सर्वात महत्त्वाची होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशीही चर्चा केली होती . परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान अल्बानीज यांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीबद्दल आणि बहुराष्ट्रीय व्यासपीठांवर सहकार्याबद्दल चर्चा केली.

पंतप्रधान मोदी नुकताच केला युक्रेन दौरा

23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन दौरा केला. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी केवळ द्विपक्षीय चर्चाच केली नाही, तर युक्रेनियन भूमीवरील हे युद्ध संपवण्यासाठी संवादाच्या उपायांची खुलेपणाने चर्चा केली होती. यावेळी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले होते की, भारताने युक्रेन शांतता चर्चेचे आयोजन केले तर ते यायला तयार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news