

PM Modi Age Statement During Student Interaction: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी काही राजकीय सुतोवाच देणारी वक्तव्ये देखील केली. मोदींनी विद्यार्थ्यांना गेल्या काळाचा हिशेब ठेवण्यापेक्षा येणाऱ्या भविष्याबाबत विचार करायला हवा असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा एक किस्सा देखील सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मला एका नेत्याने माझ्या वाढ दिवसादिवशी फोन केला होता. १७ सप्टेंबर रोजी फोन करून मला हे नेता म्हणाला की, तुम्हा आता ७५ वर्षाचे झाले आहेत. त्यावर मी त्यांना पटकन अजून २५ वर्षे शिल्लक आहेत असं उत्तर दिलं. मी पाठीमागची वर्षे मोजत नाही. जी राहिली आहेत ती मोजतो.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरित करत तुम्ही देखील मागचं मोजण्यात वेळ वाया घालवू नका पुढं काय आहे याचा विचार करा असा सल्ला दिला. मोदींनी हे वक्तव्य ज्यावेळी एका विद्यार्थ्यानं त्याचा देखील जन्मदिवस १७ सप्टेंबरलाच असतो असं सांगितल्यावर केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तमानपत्रात परीक्षेबाबत ती फार कठीण असते असं छापून येतं. याचं कारण कारण काय? प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमाच्या बाहेरची तर नसते. मग परीक्षा कठीण असं का म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे लोकांना शॉर्टमध्ये वाचायची सवय लागली आहे.
आता विद्यार्थी गेल्या १० वर्षातील पेपरमधील प्रश्न वाचून परीक्षेला येतात. त्यामुळं अभ्यासक्रमापेक्षा वेगळा प्रश्न आला की त्यांना परीक्षा कठीण वाटते. पंतप्रधान मोदींनी ज्यावेळी मी अभ्यास करत होतो त्यावेळी देखील असंच होत होतं. असं सांगितलं. हा आजार काही शिक्षक देखील पसरवतात असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी जर एक गोलंदाज फक्त आपला खांदाच मजबूत करत राहिला तर तो चांगला खेळाडू होऊ शकतो का त्याला यासाठी संपूर्ण शरीर मजबूत करावं लागेल असं उदाहरण देखील दिलं.
पंतप्रधान मोदी यांनी परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. परीक्षा हे आयुष्य सुधारण्याचं एक साधन आहे. मात्र हे अंतिम नाही. अंतिम लक्ष्य संपूर्ण आयुष्य चांगलं करणं हे आहे. १० वर्षाचे पेपर वाचून जाण्यासारख्या विचारांपुरतेच मर्यादित ठेवू नका, आयुष्यात सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा असा सल्ला देखील मोदींनी दिला.