PM Modi - CM Fadnavis : शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी: पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक!

महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे गौरोवद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली आणि अरुणाबाई व रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुक्काम केला.

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता आणि त्यांच्या कल्याणासाठी सरकारची असलेली बांधिलकी या कृतीतून अधोरेखित होत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीचे वर्णन मनाला स्पर्श करणारे असे केले. मुख्यमंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गावात गेले आणि शेतकरी कुटुंबाच्या घरी मुक्काम केला, ही बाब विशेष उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. सरकारच्या या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब मुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून येते, असेही मोदी यांनी आपल्या कौतुकपर संदेशातून अधोरेखित केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.