ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाला चिदंबरम यांना पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली

भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाला चिदंबरम यांनी शनिवारी पहाटे निधन
Dr. Rajagopal Chidambaram Passes Away |
प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाला चिदंबरम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन त्यांना आदरांजली वाहिली.

नरेंद्र मोदी म्हणाले की, डॉ. राजगोपाला चिदंबरम यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. ते भारताच्या अणुक्षेत्रातील एक प्रमुख रचनाकार होते. त्यांनी भारताच्या वैज्ञानिक क्षमतांना मजबूत करण्यासाठी क्रांतिकारी योगदान दिले आहे. संपूर्ण देश त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे. त्यांचे हे प्रयत्न पुढील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देतील, असे पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाला चिदंबरम यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात पहाटे ३.२० वाजता अखेरचा श्वास घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news