PM Modi : ओबीसी आरक्षण काढून मुस्लिमांना देण्याचा डाव; संविधान दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर 'अप्रत्‍यक्ष' घणाघात

PM Modi on Samvidhan Divas : विरोधक बनलेत ‘अवरोध पक्ष’, महिला आरक्षणावरूनही विरोधकांवर हल्‍लाबोल
PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी.Pudhari news
Published on: 
Updated on: 

PM Modi on Samvidhan Divas : "सर्वात मोठा विरोधी पक्ष ओबीसी आरक्षणात कपात करून ते मुस्लिमांना देण्याच्या विचारात आहे," अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २६ नोव्‍हेंबर)'संविधान दिना' निमित्त लिहिलेल्‍या लेखातून केली आहे. या लेखातथेट काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करता विरोधकांवर हल्‍लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी हा लेख त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केला आहे.

पंतप्रधानांनी विविध घटनादुरुस्त्यांकडे वेधले लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्‍या लेखात राष्ट्रासाठी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना नमूद केले आहे की, सरकारने मागील दहा वर्षांपूर्वी २६ नोव्‍हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या विविध घटनादुरुस्त्यांचाही उल्लेख केला आणि त्याद्वारे लोकांच्या जीवनात कसे महत्त्वपूर्ण बदल घडले, हे स्पष्ट केले. विशेषतः, त्यांनी 'वस्तू आणि सेवा कर' (GST) लागू करण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्त्या आणि 'आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी' (EWS) १० टक्के आरक्षण देण्याबाबतच्या घटनादुरुस्त्यांकडे लक्ष वेधले.

PM Narendra Modi
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉर्पोरेट क्षेत्राला थेट सवाल

‘ओबीसी कोट्यात कपात करण्याचा विरोधकांचा प्रयत्न’

ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर अप्रत्‍यक्ष टीका केली. त्‍यांनी लेखात म्‍हटलं आहे की, “विरोधी पक्षातील सर्वांत मोठा पक्ष ओबीसी आरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देऊ इच्छितो, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आपले संविधानकर्ते, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पूर्णपणे विरोधात होते.” सध्याच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे.

महिला आरक्षणावरूनही विरोधकांवर हल्‍लाबोल

महिला आरक्षणाच्या विषयावर पंतप्रधान मोदींनी म्‍हटलं आहे की, “संविधान घडवण्यात ज्या कर्तृत्ववान महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यांच्या आठवणीशिवाय आपल्या संविधानाचा प्रवास अपूर्णच राहील. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या प्रकाराने आपल्या सर्वांनाच मान खाली घालायला लावली. विधीमंडळांमध्ये नारीशक्तीला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या हेतूने आणलेले विधेयक विरोधी पक्षातील एका प्रमुख पक्षाने मंजूर होऊ दिले नाही. संवैधानिक मूल्यांबद्दल त्यांच्या मनात किती कमी आदर आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नारीशक्तीला न्याय देण्याचा आमचा निर्धार जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वास मी देशभरातील महिलांना देतो,” अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली.

PM Narendra Modi
PM Modi GTA 6 Post: १३ वर्षांत भारत किती बदलला? GTA 6च्या निमित्ताने मोदींचा काँग्रेसवर निशाणा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

विरोधक बनलेत ‘अवरोध पक्ष’

"आपल्या घटनात्मक लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका सुस्पष्ट आहे, पण आज दुर्दैवाने विरोधी पक्षातील सर्वांत मोठा पक्ष आज ‘विरोध पक्ष’ होण्यापेक्षा ‘अवरोध पक्ष’ बनत चालला आहे. लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणणे हा घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा पर्याय कधीच ठरू शकत नाही, हे त्यांनी समजून घ्यायला हवे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी लेखात नमूद केले आहे.

PM Narendra Modi
PM Modi: बचत वाढवा! पंतप्रधान मोदींचा मोलाचा सल्ला; नेमकं कारण काय?

‘वैचारिक नक्षलवाद आजही कायम’

“अनेक दशके देशातील विविध भागांत, प्रामुख्याने आदिवासी पट्ट्यात, नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर सामान्य आणि गरीब नागरिकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले. या वर्षी नक्षलवादाचा बीमोड झाल्याचे मला विशेष समाधान आहे. आता गरीब नागरिकही कोणत्याही भीतीशिवाय आपल्या घटनात्मक हक्कांचा वापर करू शकतात. सशस्त्र नक्षलवाद संपुष्टात आल्यानंतर आता केवळ वैचारिक नक्षलवाद शिल्लक राहिला आहे. हे घटक आजच्या काळातील वास्तवापासून दूर असून देशाच्या विकासाची वाट रोखण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहेत,” असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.