Operation Sindoor |'ऑपरेशन सिंदूर' नंतर पीएम मोदींनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

PM Modi meets President Droupadi Murmu | राष्ट्रपती कार्यालयाकडून ‘एक्स’वर पोस्ट
PM Modi meets President Droupadi Murmu
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. (Pudhari Photo)
Published on
Updated on

PM Modi President Droupadi Murmu meeting

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ७) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सविस्तर माहिती दिली. या कारवाईत, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या भेटीची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट करुनही दिली आहे.

सीमा भागातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक

तर दुसरीकडे, पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला सीमेवरील राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

या बैठकीत जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कडक नजर ठेवण्यास सांगितले.

PM Modi meets President Droupadi Murmu
Operation Sindoor: 25 मिनिटे, नऊ तळ.. भारताने असा घेतला बदला; कॅप्टन सोफिया- विंग कमांडर व्योमिका यांनी सांगितली Inside Story

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news