PM Modi Instagram followers | डिजिटल दुनियेत PM मोदींचा दबदबा; इन्स्टाग्रामवर १० कोटींचा टप्पा पार करणारे ठरले पहिले ग्लोबल लीडर

हा केवळ एक आकडा नसून, जागतिक राजकारणातील डिजिटल युगात भारतीय नेतृत्वाची ठळक छाप असल्याचे मानले जात आहे
PM Modi Instagram followers
PM Modi Instagram followers
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या विश्वात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सची संख्या तब्बल १० कोटींहून अधिक झाली असून, हा विक्रम करणारे ते जगातील पहिले नेते ठरले आहेत.

२०१४ साली इन्स्टाग्रामवर पदार्पण केल्यानंतर मोदी यांनी या प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर केला. विविध सरकारी कार्यक्रम, परदेश दौरे, सांस्कृतिक क्षण, तसेच वैयक्तिक आठवणी यांचे फोटो आणि व्हिडीओ ते नियमितपणे शेअर करतात. त्यामुळे देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याचे दिसून येते. यावरून जागतिक स्तरावर मोदी यांची डिजिटल उपस्थिती आणि प्रभाव अधोरेखित होतो.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पारंपरिक माध्यमांसोबतच सोशल मीडियाचा प्रभावी वापर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याची ही पद्धत त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देते. इन्स्टाग्रामवरील हा १० कोटींचा टप्पा केवळ एक आकडा नसून, जागतिक राजकारणातील डिजिटल युगात भारतीय नेतृत्वाची ठळक छाप असल्याचे मानले जात आहे.

फेसबुक, एक्सवरील PM मोदींचे फॉलोअर्स किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत फेसबुक पेजवर अंदाजे ५ कोटी ४० लाख फॉलोअर्स (54 million) फॉलोअर्स आहेत, असे ताज्या अहवालांत वर्णन आहे. तर X (ट्विटर) वरील अधिकृत अकाऊंटवर पंतप्रधानांचे सुमारे १० कोटी ८७ लाख फॉलोअर्स आहेत. जे जगभरातील सत्तेत असलेल्या नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्सपैकी एक मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news