PM Rally TMC-BJP Stone Pelting: पंतप्रधानांच्या रॅलीपूर्वी तृणमूल-भाजपमध्ये हाण तू बडीव... प्रकरण गेलं दगडफेकीपर्यंत

PM Rally TMC-BJP Stone Pelting
PM Rally TMC-BJP Stone Peltingpudhari
Published on
Updated on

PM Rally TMC-BJP Stone Pelting: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलकातामध्ये प्रचार रॅली होणार आहे. मात्र या रॅलीपूर्वीच भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हे प्रकरण एवढं वाढलं की दोन्ही गटामध्ये दगडफेक देखील झाली.

PM Rally TMC-BJP Stone Pelting
Mira Bhayandar ward structure : पालिकेच्या 6 प्रभाग समित्यांतर्गत रचनेला भाजपाकडून मंजुरी

तृणमूल काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांवर बंगालचे मंत्री डॉक्टर शशी पांजा यांच्या गिरीश पार्क मधील कार्यालयात दगडफेक केल्याचा आरोप केला. या दगडफेकीत तृणमूल काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी प्रशासनाला अतिरिक्त पोलीस बल तैनात करावं लागलं.

PM Rally TMC-BJP Stone Pelting
Thane Patlipada Dongripada eviction: पातलीपाडा–डोंगरीपाडा घरांवर कारवाईचा आदेश; ५ हजार कुटुंबांचा निवारा धोक्यात

दुसरीकडं भाजपनं दावा केला की तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॅलीमध्ये जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक भाजप कार्यकर्ते जखमी झाले. या गोंधळात भाजपचे नॉर्थ कोलकाता जिल्हा अध्यक्ष तमोघ्नाय घोष हे देखील जखमी झाले आहेत.

PM Rally TMC-BJP Stone Pelting
Konkan Zilla Parishad Election: कोकणात शिवसेनेचे वर्चस्व कायम; जिल्हा परिषदेत नंबर 1 चे स्थान अबाधित

डॉक्टर शशी पांजा यांनी सांगितलं की भाजपच्या लोकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. त्यांनी बाहेरून आलेल्या लोकांनी त्यांच्या घराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. भाजप समर्थकांना घेऊन जात असलेल्या बसमध्ये देखील दगड ठेवण्यात आले होते असा देखील दावा पांजा यांनी केला .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news