UP निवडणूक: भाजप-RSS ची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच रविवारी सायंकाळी उशिरा दिल्लीत भाजप आणि संघ (आरएसएस) यांच्यात सर्वोच्च पातळीवर बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या बैठकीला हजेरी लावली.

अधिक वाचा : ॲमेझॉन यूजर्ससाठी मोठी बातमी; कंपनीने बंद केली 'ही' सेवा पण…

कोरोना साथीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सरकार आणि पक्षाच्या प्रतिमेबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या दुसर्‍या लाटेतून लोक सरकारवर रोष व्यक्त करीत आहेत. या बैठकीत यावरही चर्चा झाल्याचे मानले जाते.

कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे उत्तर प्रदेशात सर्वांत दयनीय स्थिती झाली आहे. जिथे गंगेमध्ये तरंगलेल्या मृतदेहांनी एक भयानक दृश्य समोर आले आहे. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना सेवेसाठी समर्पित करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्षांना जनसेवेत रुजू होण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा : बाबा रामदेवांच्या पतंजली आयुर्वेदमध्ये कोरोना घुसला! दुग्ध व्यवसाय सीईओंचा कोरोनाने बळी

याखेरीज पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असलेल्या उत्तर प्रदेशमधील परिस्थितीवरही चर्चा झाली. राज्यातील कोविडच्या सद्य परिस्थितीवरही चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आरएसएस सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबाळे आणि उत्तर प्रदेश संघटनेचे मंत्री सुनील बन्सल उपस्थित होते.

सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत संघटना आणि सरकारबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सत्ताधारी पक्ष कोविडच्या दुसर्‍या लाटेत पंतप्रधान मोदी आणि सरकारवर होत असलेल्या चौफेर टीकेमुळे चिंतित आहेत. कोरोना संकटाने देशात ऑक्सिजन, औषधे, हॉस्पिटल बेड आणि लसींचा अभाव, आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहे हे अधोरेखित केलं आहे. 

अधिक वाचा : 'भारताने उशीर केला! लस ऑर्डरसाठी कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, आता मर्यादित पर्याय शिल्लक'

logo
Pudhari News
pudhari.news