Poonch border security | पूँछमध्ये सीमेवर पिस्तूल, अमली पदार्थ जप्त

दोन हँडग्रेनेड, आक्षेपार्ह पोस्टर्स जप्त
Poonch border security |
Poonch border security | पूँछमध्ये सीमेवर पिस्तूल, अमली पदार्थ जप्तFile Photo
Published on
Updated on

जम्मू; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवादी आणि तस्करीविरोधी कारवाया तीव्र केल्या असून पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) शस्त्र आणि संशयित अमली पदार्थांनी भरलेली बॅग जप्त केली आहे. कुलगाममध्ये संयुक्त कारवाईत दहशतवादी संघटनांना मदत करणार्‍या ओव्हर ग्राऊंड वर्करला अटक करण्यात आली आहे.

22 जॅक रायफलच्या एरिया डॉमिनेशन पथकाने शोधमोहीम राबवित असताना नियंत्रण रेषेजवळ एका झाडाशेजारी जमिनीत पुरून ठेवलेली बॅग आढळून आली. परिसरातील संभाव्य आयईडी किंवा स्फोटकांचा धोका दूर केल्यानंतर बॅग जप्त करण्यात आली. या बॅगेत चिनी बनावटीची पिस्तूल, अमली पदार्थसद़ृश काही पाकिटे, ‘लाहोर’ असे लिहिलेली एक बॅग सापडल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

दुसर्‍या कारवाईत, कुलगाम पोलिसांनी भारतीय सैन्य आणि सीआरपीएफच्या मदतीने मोहम्मदपोरा भागात संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी आदिल सादिक लोन या ओव्हर ग्राऊंड वर्करला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून दोन हँडग्रेनेड, आक्षेपार्ह आणि भडकाऊ पोस्टर्स जप्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news