डायबिटीज रुग्‍ण संख्‍या वाढीप्रश्‍नी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

Diabetes in India : २७ ऑगस्ट रोजी होणार सुनावणी
Diabetes in India
देशभरात वाढत्‍या डायबिटीज (मधूमेह) रुग्‍ण संख्‍येत हाेणार्‍या वाढीबाबत चिंता व्‍यक्‍त करणारी जनहित याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल झाली आहे. Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात वाढत्‍या डायबिटीज (मधूमेह) रुग्‍ण संख्‍येत हाेणार्‍या वाढीबाबत चिंता व्‍यक्‍त करणारी जनहित याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल झाली आहे. साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त आणि कमी पोषक असलेल्या पॅकेज खाद्यपदार्थांवर फ्रंट ऑफ पॅकेज लेबलिंग (एफओपीएल) साठी नियमन तयार करण्याचे निर्देश सरकारला देण्‍यात यावे, अशी मागणी या याचिकेतून करण्‍यात आली आहे. यावर आता २७ ऑगस्‍ट रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. (Diabetes in India)

डायबिटीज भारतात एक मूक महामारी

डायबिटीज हा रोग भारतात एक मूक महामारी म्हणून उदयास आला आहे. यामुळे देशातील लाखो लोक प्रभावित झाले आहेत. याचा परिणाम आपल्या आरोग्य सेवा प्रणालीवरही झला आहे. भारतात, असंसर्गजन्य रोगांमुळे (NCDs) दरवर्षी सहा दशलक्ष लोकांचा बळी जातो. धक्कादायक म्हणजे, देशातील ४ पैकी एका व्यक्ती मधुमेहाने ग्रासलेली आहे. मधुमेह होण्‍यामागील महत्त्‍वाचे कारण लठ्ठपणा आहे,” असे 3S आणि अवर हेल्थ सोसायटी या अशासकीय संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकांमध्ये म्हटले आहे.

Diabetes in India
Sugar Level कंट्रोलसाठी दुपारी किंवा संध्‍याकाळी केलेला व्‍यायाम ठरतो फायदेशीर : नवीन संशोधनातील निष्‍कर्ष

याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयात २७ ऑगस्ट रोजी सुनावणी

याचिकेत असेही म्‍हटलं आहे की, साखर, मीठ आणि तेलाचे प्रमाण जास्त आणि कमी पोषक असलेल्या पॅकेज खाद्यपदार्थांवर सामान्यत: जाहिरातींवर ग्राहक सूचनांची अंमलबजावणी समाविष्ट असते. यामुळे नागरिकांना पॅकबंद अन्न आणि शीतपेयांमध्ये असलेले पौष्टिक घटक आणि हानिकारक घटक सहजपणे ओळखण्यास आणि समजून घेण्यास सक्षम करते, ज्यामुळे ते निरोगी निवडी करण्यास सक्षम होतात, असे त्यात म्हटले आहे. सर्वोच्‍च न्‍यायालय आता या याचिकेवर सुनावणी घेणार असून पुढील सुनावणी २७ ऑगस्‍ट रोजी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news