पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

केंद्र सरकारकडून विंडफॉल टॅक्स रद्द
Petrol, diesel likely to become cheaper, central government abolishes windfall tax
पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे. यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या आठवड्यात पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी पेट्रोल-डिझेल नजीकच्या काळात स्वस्त होण्याचे संकेत दिले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किमतीचा आढावा घेतल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून विंडफॉल टॅक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर रोड सेस (आयआरसी) हटविण्याबाबत हालचाली सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत उत्पादित होणार्‍या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्ससह आयआरसी रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या निर्णयाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून केंद्र सरकारच्या वतीने संसदेमध्येही ही माहिती दिली आहे.

एक जुलै 2022 रोजी केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्स लागू केला होता. विशिष्ट परिस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांना जादा नफा मिळतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी हा कर लागू करण्यात आला आहे. अन्य देशांच्या धर्तीवर भारतानेही देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादक आणि निर्यातदार यांच्यावर विंडफॉल टॅक्स लावला होता.

विंडफॉल टॅक्स का लावला होता

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चात्त्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लागू केले होते. यामुळे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना प्रचंड नफा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने 2022 साली हा कर लागू केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news