पवन कल्‍याण यांच्या रशियन पत्‍नीने तिरूमला येथे केले मुंडण, मुलासाठी केला होता नवस

मंदिरातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही घेतला सहभाग
pawan kalyan russian wife shaved her head after her son recovery first photo from tirumala
पवन कल्‍याण यांच्या रशियन पत्‍नीने तिरूमला येथे केले मुंडणFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्‍याण यांच्या पत्‍नीने मुलाच्या आरोग्‍यासाठी तिरूपती बालाजीला साकडे घातले होते. त्‍याची पूर्ती त्‍यांनी मंदिरात येउन पूर्ण केली. त्‍यांनी तिरूमला मंदिरात केस कापून मुंडण केले. यावेळी त्‍यांनी भगवान व्यंकटेश्वरांची मनोभावे प्रार्थना केली. यावेळी मंदिरातील अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही त्‍यांनी सहभाग नोंदवला.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्‍याण यांच्या पत्‍नीने रविवारी तिरूमला मंदिरात आपले केस कापून मुंडण करत देवाला दिलेला शब्‍द पूर्ण केला. गेल्‍या काही दिवसांपूर्वी सिंगापूरमधील एका शाळेत आग लागल्‍याची घटना घडली होती. या घटनेत त्‍यांचा मुलगा जखमी झाला होता. त्‍याच्या सुरक्षेसाठी आणि चांगल्‍या आरोग्‍यासाठी त्‍यांनी व्यंकटेश्वरा स्‍वामींकडे प्रार्थना केली होती. अन्ना कोनिडेला यांनी देवाप्रती आपली कृतज्ञतेच्या प्रतिकाच्या स्‍वरूपात आपले केस अर्पित करून व्यकेटेश्वराला धन्यवाद दिले.

८ एप्रिल रोजी सिंगापूरमधील एका उन्हाळी शिबिरात आगीची घटना

कल्‍याण जोडप्याचा मुलगा मार्क शंकर सिंगापूरमध्ये एका समर कँम्‍पमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. जिथे ८ एप्रिल रोजी आग लागली. या आगीच्या घटनेत त्‍याचे हात आणि पाय भाजले गेले आहेत. मात्र सुदैवाने त्‍याचा जीव वाचला होता. या दुर्घटणेत जखमी मुलाच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्‍यासाठी अन्नाने तिरूमला मंदिरात केस अर्पण करण्याची प्रार्थना केली होती.

पद्मावती कल्याण कट्टामध्ये केस केले अर्पण

जनसेना पक्षाने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, उपमुख्यमंत्री कल्याण यांच्या पत्नी अण्णा यांनी मंदिराच्या परंपरेनुसार 'पद्मावती कल्याण कट्ट्यावर' आपले केस अर्पण केले. त्यानंतर त्‍या धार्मिक विधींमध्येही सहभागी झाल्‍या.

मुलगा बरा झाल्यावर केस देवाला केले अर्पण

जनसेना पक्षाच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, अण्णा कोनिडेला यांनी प्रतिज्ञा केली होती की जर त्यांचा मुलगा अपघातातून वाचला तर ती देवतेला आपले केस अर्पण करेल. अपघातात जखमी झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा बरा आहे, त्यामुळे अण्णांनी आपले डोके मुंडून करून आपले व्रत पूर्ण केले आहे.

भगवान व्यंकटेश्वरावर विश्वास व्यक्त केला

प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, अण्णा कोनिडेला ही एक रशियन ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आहे, म्हणून तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) च्या नियमांनुसार, तिने प्रथम मंदिर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भगवान वेंकटेश्वरावर विश्वास जाहीर केला आणि घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. नंतर त्यांनी मंदिराला भेट दिली आणि विविध विधींमध्ये भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news