

नवी दिल्ली : अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी नुकतीच राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते गणेश ढवण यांना इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. संसदीय कार्यपद्धती आणि धोरणात्मक बाबींची सखोल माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम राज्यसभा सचिवालयाकडून आयोजित केला जातो.
गणेश ढवण यांनी तीन आठवड्यांच्या या इंटर्नशिपदरम्यान संसदीय प्रक्रिया, संसदीय चर्चा, विविध समित्यांची कार्यशैली आणि धोरण निर्मिती प्रक्रिया या विषयांचा प्रशिक्षण घेतले. यामध्ये संसद सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, खासदार आणि संबंधित विषयांच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
राज्यसभा संशोधन इंटर्नशिपसाठी देशभरातून ३५ तरुणांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये देशभरातील १० वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थी होते. महाराष्ट्रातून गणेश ढवण हे एकमेव प्रतिनिधी होते.
राज्यसभा इंटर्नशिप पूर्ण करणे हा माझ्यासाठी महत्वाचा अनुभव होता. यामध्ये संसदीय कामकाज आणि प्रक्रिया जवळून समजून घेता आली. सार्वजनिक सेवा आणि धोरणनिर्मितीबाबत सविस्तर अभ्यास झाला. विविध क्षेत्रातील संसद सदस्यांशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर देशाच्या उपराष्ट्रपतींकडून प्रमाणपत्र मिळणे, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे. या संपूर्ण प्रवासात मला खा. डॉ. फौझिया खान यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे मनापासून आभार मानतो.
गणेश ढवण