

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदचे हिवाळी अधिवेशन आज (दि.25) सुरु होत आहे. या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसातून सर्वांना संबोधित केले. यामध्ये ते म्हणाले, "देशाची राज्यघटना लिहून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यासाठी संसदेत आम्ही सर्वजण मिळून संविधान उत्सवाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे हे संसदेच हे सत्र विशेष असणार आहे. संविधान निर्माण करताना समाजातील प्रत्येक घटनेचा त्यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे भारतीय संविधानासारखा इतका चांगला दस्ताऐवज आपल्याला मिळाला आहे."
यावेळी त्यांनी बोलताना विरोधकांवर टीका केली. संसदेमध्ये ज्यांना लोकांनी नाकारले असे लोक गदारोल घालण्याचा प्रयत्न करतात. नविन उर्जा, उत्साह घेऊन आलेल्या नवनिर्वाचित खासदारांना हे गदारोळ घालणारे लोक बोलू देत नाहीत. त्यांच्या आवाज दाबला जातो, त्यामुळे संसदेमधील चर्चेमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असेही ते म्हणाले.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदाराबद्दल बोलताना म्हणाले, "भारतातील मतदार लोकशाहीला समर्पित आहेत, त्यांचे संविधानाप्रती समर्पण आहे, त्यांचा संसदीय कार्यपद्धतीवरचा विश्वास आहे, संसदेत बसलेल्या आपल्या सर्वांना लोकांच्या भावनांनुसार जगावे लागेल आणि हे आहे. त्याची भरपाई करण्याचा एकच उपाय आहे की आपण प्रत्येक विषयाचे विविध पैलू सभागृहात ठळकपणे मांडले पाहिजेत, त्यातून येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा मिळेल फलदायी. मी पुन्हा एकदा सर्व आदरणीय खासदारांना हे अधिवेशन उत्साहाने आणि उत्साहाने पुढे नेण्यासाठी आमंत्रित करतो."