

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा ते झिरो फाटा या मुख्य मार्गावरील माटेगाव शिवारातील रोडवर ७ डिसेंबर शनिवार रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिहेरी अपघाताची घटना घडली.अपघातातील पुंजाजी किशनराव बनसोडे(४२ वय )रा. पिंपळगाव बाळापूर ता.पूर्णा व सुकी येथील संदीप सुभाष ईंगोले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या घटने विषयी अधिक माहिती अशी,पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथील पुंजाजी किशनराव बनसोडे हे ता.७ डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी आपल्या एम एच १४ गावाकडे जात होते. तर सुकी येथील संदीप सुभाष ईंगोले हे माटेगावकडून गाडी क्रमांक एम एच २९ व्ही ३७७५ पूर्णेकडे निघाले होते. तर दुसरा एक मोटारसायकल स्वार क्रमांक एम एच २० ए एम १०७२ गाडीवरुन पूर्णेकडे जात असताना माटेगाव शिवारातील एका नदीपूलाजवळ रोडवर समोरासमोर येताच ह्या तिघांची परस्परात जोरदार धडक होऊन अपघात झाला.अपघातात पुंजाजी बनसोडे व संदीप ईंगोले यांच्या पायास व डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती असून पुढील तपास पूर्णा पोलिस करीत आहे.