IndiGo flight hits turbulence | एका क्षणात प्रवाशांचा जीव मुठीत आला!, श्रीनगरमध्‍ये इंडिगाे विमानाच्‍या लॅडिंगवेळी काय घडलं?

विमानाला 'गारपीट'चा फटका, 227 प्रवाशांनी अनुभवला जीवघेणा थरार
IndiGo flight
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाला जोरदार गारपीट वादळाचा फटका बसला. विमानाच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले.
Published on
Updated on

IndiGo flight hits turbulence : दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाला जोरदार गारपीट वादळाचा फटका बसला. विमानाच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. विमान धावपट्टीवर उतरत असताना हा प्रकार घडल्‍याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काहींनी मोठ्याने आरडाओरडा केल्‍याने एकच गोंधळ उडला. सुदैवाने विमानाचे श्रीनगर विमानतळावर संध्याकाळी 6.30 वाजता सुरक्षित लँडिंग झाले. एका प्रवाशाने विमानाच्‍या लॅडिंगवेळी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रवाशांचा आरडाओरड आणि जीवघेणी भीती...

यांदर्भात 'इंडिया टूडे'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, 227 प्रवासी घेऊन निघालेले हे विमान बुधवारी सांयकाळी श्रीनगरला विमानतळावरील धावपट्टीवर उतरण्‍याच्‍या तयारीत असताना अचानक वादळात अडकले. विमानाला खराब हवामानाचा बसलेला फटका आणि यानंतर प्रवाशांनी उडालेल्‍या घबराहटीचा एका प्रवाशाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विमानावर गारा पडत असल्याचे दिसून येते. संपूर्ण विमान जोरदार हादरताना दिसते. व्हिडिओमध्ये प्रवाशांची घबराहट, ओरडाओरड आणि भीती स्पष्टपणे दिसून येते.

IndiGo flight
Video : हवेतच विमानाच्‍या इंजिनने घेतला पेट…. १८५ प्रवाशांनी अनुभवला जीवघेणा थरार

विमानाचे सुरक्षित लँडिंग

विमानाचे श्रीनगर विमानतळावर संध्याकाळी 6.30 वाजता यशस्वीरित्या लँडिंग करण्यात आले. लँडिंगपूर्वी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली होती. उतरल्यानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, मात्र या घटनेमुळे प्रवाशांना मानसिकदृष्ट्या मोठा धक्‍का बसला. ही घटना घडल्यानंतर विमान कंपनीने हे विमान "एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड" (तपासणी आणि दुरुस्‍तीसाठी) असल्‍याचे घोषित केले आहे.

IndiGo flight
Indigo Airlines : ‘इंडिगो’चे विमान भरकटलं, पाकिस्तानात पोहोचलं!

सर्व प्रवाशी सुरक्षित

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2142 ला खराब हवामानाचा सामना करावा लागला. पायलटने श्रीनगर एटीसीला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली होती. सर्व 227 प्रवासी आणि एअरक्रू सुरक्षित आहेत. दरम्‍यान, या घटनेबाबत इंडिगो कंपनीने प्रसिद्ध केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E2142 ला अचानक आलेल्या गारपिटीचा फटका बसला. फ्लाइट आणि कॅबिन क्रूने सर्व प्रोटोकॉलचे पालन केले. विमान सुरक्षितरीत्या श्रीनगरमध्ये उतरवण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत विमानतळावरील टीमने त्यांची देखभाल केली. तपासणी व दुरुस्तीनंतरच विमान पुन्हा उड्डाणासाठी सज्ज केले जाईल.”

IndiGo flight
Fact Check : खरंच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडलं का?, 'पाक सोशल आर्मी'चं बिंग फुटलं, 'तो' व्हिडिओ महाराष्ट्रातील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news