पाकिस्‍तानहून आलेल्‍या सीमा हैदरने गोंडस मुलीला दिला जन्म, सचिनच्या घरी आली धनाची पेटी

सीमा हैदर आणि सचिन घरी पाळणा हलला...
pakistani seema haider gave birth to baby girl with husband sachin meena in private hospital
पाकिस्‍तानहून आलेल्‍या सीमा हैदरने गोंडस मुलीला दिला जन्मFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

पाकिस्तानातून आपल्या ४ मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात आलेल्या सीमा हैदर आणि तिचा पती सचिन मीना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्‍याच असं झालंय की, सीमा आणि सचिनच्या घरी आज (मंगळवार) सकाळी ४ वाजता मुलीने जन्म घेतला आहे. सीमाला आपली बहिण माणणाऱ्या सुप्रीम कोर्टाचे वकील एपी सिंह यांनी माहिती दिली आहे की, सीमा सचिन मीणाने एका खासगी रूग्‍णालयात नार्मल डिलीव्हरी होत एका गोंडस बाळाला मुलीला जन्म दिला आहे. त्‍यांच्या घरी धनाची पेटी आली आहे.

ते म्‍हणाले की, आमच्या सर्व कुटुंबासाठी ही एक आनंदाची गोष्‍ट आहे. आई आणि मुलगी दोघेही आरोग्‍यदायी आहेत. पुढे मुलीच्या नावाच्या प्रक्रियेत आम्‍ही सोशल मीडियाव्दारे नावाचे अभिप्राय मागवणार आहाेत. या बातमीने साेशल मीडियावर सचिनला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

सीमाचे ओटीभरणे या महिन्यात झाले

मुलीच्या जन्मापूर्वी, सीमाचा ओटीभरणेचा सोहळा ग्रेटर नोएडातील राबुपुरा येथे पार पडला. या खास प्रसंगी सीमाचे वकील आणि दत्तक भाऊ डॉ. एपी सिंग हे त्यांच्या आईसोबत या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमात महिलांनी पारंपारिक गाणी गाऊन विधी संस्मरणीय बनवला. या खास प्रसंगी, परिसरातील महिलांनी पारंपारिक ओटीभरणे समारंभाची गाणी गाऊन कार्यक्रम अधिक खास बनवला.

पब-जी गेमद्वारे सचिनशी मैत्री

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सीमा हैदर पब-जी गेमद्वारे सचिन मीनाच्या संपर्कात आली. दोघांमध्ये प्रेम फुलले. यानंतर, सीमा तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली.

नेपाळमध्ये मंदिरात केले लग्‍न

मिळालेल्‍या माहितीनुसार, २०१९ मध्ये पाकिस्‍तानहून सीमाचा पती नोकरीसाठी सऊदी अरबला गेला होता. तेथुनच तो सीमाला पैसा पाठवत होता. मात्र २०१९ नंतर तो केंव्हाच पुन्हा परत पाकिस्‍तानात आला नाही. या दरम्‍यान सीमाची PUBG व्दारे सचिनशी मैत्री झाली. मग दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. यानंतर हे दोघेही १० मार्च रोजी नेपाळमध्ये भेटले. सीमाने दावा केला की त्‍यांनी दोघांनी नेपाळमध्ये एका मंदिरात लग्‍न केले आहे. यानंतर दोघेही आपापल्‍या देशात निघुन आले.

सीमा हैदर ४ मुलांसह पाकिस्‍तानातून बाहेर पडली

यानंतर सीमाला सचिनसोबत रहायचे होते. सचिनलाही सीमासोबत रहायचे होते. सचिनने सीमाला सांगितले की, तो तिच्या ४ ही मुलांसोबत तिला स्‍विकारायला तयार आहे. यानंतर सीमाने भारतात येण्याचा निर्णय घेतला. ती मे महिण्याच्या १० तारखेला आपल्‍या ४ मुलांसह पाकिस्‍तानच्या कराची शहरातून शाहजाह पोहोचली. येथून फ्लाईटव्दारे काठमांडू पोहोचली. काठमांडूहून पोखराला एका खासगी वाहनाने आली.

सचिनकडे नोएडाला आली, यानंतर पुन्हा गेली नाही

यानंतर पोखराहून दिल्‍लीसाठी तीने बसने प्रवास केला. यावेळी रस्‍त्‍यात नोएडामध्ये सचिन तिची वाट पाहत उभा होता. २८ तासानंतर १३ मे रोजी सीमा नोएडाला पोहोचली. यानंतर सचिन सीमाला रबूपूरा परिसरातील आपल्‍या घरी घेउन गेला. या ठिकाणी दोघांनी एक भाड्याने घर घेतले आणि ते आपल्‍या मुलांसह राहू लागले. या दरम्‍यान ही गोष्‍ट पोलिसांना समजली. यानंतर ४ जुलै रोजी सचिन आणि मीना यांना अटक करण्यात आली. यानंतर दोघे न्यायालयीन जामिनावर बाहेर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news