Pakistani refugees : 'युपी'तील पाकिस्तानी निर्वासितांना मिळणार हक्‍काची जमीन !

योगी आदित्‍यनाथ सरकारला अंजनेय समितीने सादर केला अहवाल
Pakistani refugees
उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ.File Photo
Published on
Updated on

Pakistani refugees : उत्तर प्रदेश राज्‍यात स्‍थायिक झालेल्‍या पाकिस्‍तानी निर्वासितांना मोठा दिलासा मिळघला आहे. त्‍यांना उत्तराखंडच्‍या धर्तीवर जमिनीचे हक्‍क दिले जातील, असा अहवाल राज्‍य सरकारने स्‍थापन केलेल्‍या अंजनेय समितीने दिला आहे. उत्तर प्रदेशमध्‍ये सध्‍या २० हजार निर्वासित कुटुंबे ५० हजार एक जमिनीवर वास्‍तव्‍य करतात. मात्र आजपर्यंत ते हक्‍काच्‍या जमीनीपासून वंचित होते.

निर्वासित होते जमीन मालकीच्‍या हक्‍कापासून वंचित

अखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान निर्मिती झाली. यावेळी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी, रामपूर, बिजनौर आणि पिलीभीत येथे पाकिस्‍तानमधून आलेल्‍या निर्वासित स्‍थायिक झाले होते. बहुतांश निर्वासित हे हिंदू आणि शीख होते. काही वर्षांनंतर सरकारने त्‍यांना उपजीविेकसाठी जमीन दिली. मात्र जमीन सरकारचा नावावर होती. त्‍यामुळे अनेक कटुंब ही हस्‍तांतरणीय जमीन मालिकीच्‍या हक्‍कापासून वंचित राहिले होते.

Pakistani refugees
याेगी सरकारचा माेठा निर्णय : युपीत महिला कामगारांची नाईट शिफ्ट रद्द

'निर्वासितांच्या पूर्ण मालकीसाठी कायदा करणे आवश्यक'

रामपूरमधील २३ गावांमध्ये आणि बिजनौरमधील १८ गावांमध्ये निर्वासितांना स्थायिक केले आहे. तसेच काही जण लखीमपूर खेरी आणि पिलीभीतमधील वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जंगलाच्या काठावर स्थायिक झाले होते. या कुटुंबांच्या वारसांना त्यांच्या जमिनीवर बँकेकडून पीक कर्जाव्यतिरिक्त कोणतेही कर्ज घेता येत नाही. त्यांना जमीन विकण्याचा अधिकार देखील नव्‍हते. या संपूर्ण प्रकरणाच्‍या चौकशी व उपाययोजना सुचविण्‍यासाठी अंजनेय समिती स्‍थापन करण्‍यात आली. या समितीने आपला अहवाल राज्‍य सरकारला सादर केला आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, काही निर्वासित कुटुंबांना सरकारी अनुदान कायद्याअंतर्गत जमीन देण्यात आली होती. त्यांना ग्रामसभा आणि विविध विभागांच्या मालकीच्या जमिनीवर देखील स्थायिक करण्यात आले होते. सध्या, सरकारी अनुदान कायदा संपला आहे. निर्वासितांच्या पूर्ण मालकीसाठी कायदा करणे आवश्यक आहे.

Pakistani refugees
Yogi Government : मुघलांच्या इतिहासावरून योगी सरकारचा मोठा निर्णय

समितीने उत्तरखंडचे दिले उदाहरण

अंजनेय समितीने आपल्‍या अहवालात म्‍हटले आहे की, "निर्वासित कुटुंबांना दिलेल्या जमिनीवर पूर्ण मालकी म्हणजेच हस्तांतरणीय जमीनधारक हक्क देण्यासाठी स्वतंत्र कायदा आवश्यक असेल. या प्रकरणांमध्ये विद्यमान नियम शिथिल करता येतील. उत्तराखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या किमतीच्या काही टक्के रक्कम घेऊन मालकी देण्याचे काम करण्यात आले आहे. उत्तराखंडप्रमाणे उत्तर प्रदेशमध्‍यही काही किंमत घेऊन किंवा मोफत हस्तांतरणीय जमीनधारक हक्क देता येतात. यासाठी कायद्यात बदल करून त्यांना इतरत्र जमीन देण्यासाठी किंवा त्याच जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी विचार करावा लागेल. वनजमिनीवर हक्क देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाची परवानगी देखील घ्यावी लागेल. नियमांनुसार ग्रामसभेची जमीन त्याच गावातील मूळ रहिवाशांना देता येते. त्याचप्रमाणे, संबंधित विभागांनाही विभागांची जमीन देण्याचा अधिकार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news