Pak-Occupied Kashmir | पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये!

अमेरिकेने प्रकाशित केलेल्या नकाशातून संकेत
Pak-Occupied Kashmir
Pak-Occupied Kashmir | पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये!
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिका यांनी अंतरिम व्यापार करारासाठी शनिवारी एक आराखडा जाहीर केल्यानंतर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या एका नकाशाने जगाचे लक्ष वेधून घेतले.

या नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश त्यात पाकव्याप्त काश्मीर याचाही समावेश भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आला असून, चीनकडून दावा करण्यात येणारा अक्साई चीन हाही भारताचा भाग दर्शवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका भारताने नेहमीच मांडली असली, तरी हा नकाशा अमेरिकेच्या आधीच्या नकाशांपेक्षा वेगळा आहे. यापूर्वी अमेरिकेच्या नकाशांमध्ये हा वादग्रस्त प्रदेश म्हणून दाखवला जात असे. त्यामुळे हा नवा नकाशा वॉशिंग्टनच्या द़ृष्टिकोनातील सूक्ष्म; पण महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिला जात आहे.

या पावलाची वेळही महत्त्वाची मानली जात आहे. कारण, तणावपूर्ण काळानंतर भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंध नव्याने मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर 50 टक्के आयात शुल्क लावले होते, जे अमेरिकेच्या मित्रदेशांमध्ये सर्वाधिक होते. मात्र, या अंतरिम व्यापार आराखड्याअंतर्गत हे शुल्क आता 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले असून, कोणत्याही आशियाई देशासाठी हे सर्वात कमी आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे अक्साई चीनचा भारताचा भाग म्हणून करण्यात आलेला समावेश. भारताच्या आक्षेपांनंतरही चीन या प्रदेशावर सातत्याने दावा करत आला आहे. जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशासह भारताच्या सीमांचे चुकीचे चित्रण केल्याबद्दल परदेशी सरकारे आणि जागतिक संस्थांकडे भारताने वारंवार चिंता व्यक्त केली आहे.

तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी अमेरिकेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी या नकाशाचे कौतुक करत तो भारताच्या प्रादेशिक भूमिकेला पाठिंबा देणारा स्पष्ट संदेश असल्याचे म्हटले. अनेक विश्लेषकांनी याला वॉशिंग्टनमधील पाकिस्तानच्या अलीकडील राजनैतिक प्रयत्नांसाठी धक्का असल्याचे वर्णन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news