पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार करणार्‍या 'त्‍या' चार नराधमांचा फोटो आला समोर

Pahalgam terror attack : सुरक्षा यत्रणांनी शेअर केला संशयित दहशतवाद्यांचा फोटो
Pahalgam terror attack
सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी केले आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी २.३० वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्‍ला केला. या भ्‍याड हल्‍ल्‍यात निष्‍पाप २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र तसेच रेखाचित्रे जारी केली आहेत. आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या हल्ल्यात तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

गुप्‍तचर विभागाने म्‍हटलं आहे की, चार ते पाच दहशतवादी मागील एक महिन्‍यापासून पहलगाम परिसरात सक्रीय होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (एलईटी) ची शाखा असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'च्‍या दहशतवाद्‍यांनी बैसरनमध्‍ये पर्यटकांवर गोळीबार केला. कुर्ता-पायजामा परिधान केलेले किमान ५-६ दहशतवादी दरीच्या सभोवतालच्या घनदाट जंगलातून बैसरनमध्‍ये अले. यानंतर एके-४७ ने पर्यटकांवर अंदाधूंद गोळीबार केला. गुप्तचर विभागाच्‍या सूत्रांनी म्‍हटलं आहे की, हल्ल्याच्या काही दिवस आधी खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये हल्‍लेखोरांचा समावेश होता.

दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने केली हाेती पहलगामची रेकी

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी २.३० वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात मृत्युमुखी पडलेल्या २६ पर्यटकांपैकी युएई आणि नेपाळमधील नागरिकांचाही समावेश आहे. प्राथमिक फॉरेन्सिक अहवाल आणि हल्‍ल्‍याचे साक्षीदारांनी दिलेल्‍या माहितीनुसार दहशतवाद्यांनी लष्करीच्‍या गणवेषात आले होते. तसेच दहशतवाद्यांनी संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड करण्यासाठी बॉडी कॅम आणि हेल्मेट-माउंटेड कॅमेरे घातले होते. हल्लेखोर पूर्ण तयारीने आले होते आणि त्यांनी सुकामेवा आणि औषधे साठवली होती. सूत्रांनी सांगितले की दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने पहलगामची रेकी देखील केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्‍लेखोरांपैकी दोन दहशतवादी पश्तो भाषेत बोलत होते (पश्‍तो ही पाकिस्‍तानमधील मूळ भाषा आहे. तर दोन दहशतवादी स्थानिक (आदिल आणि आसिफ) होते. स्थानिक दहशतवादी बिजभेरा आणि त्राल येथील आहेत.

द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) The Resistance Front (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गुप्तचर संस्थांच्या माहिती नुसार, लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिद हा कट रचणाऱ्यांपैकी एक असल्याचा संशय आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सुमारे ८-१० दहशतवादी सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ५-७ दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचा संशय आहे. दरम्‍यान, या हल्‍ल्‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा त्यांचा हाय-प्रोफाइल दौरा अर्धवट सोडून घरी परतल्यानंतर पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आसिफ यांनी भारताविरोधात विधाने केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news