

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर 'पद्मभूषण' तर अशोक सराफ यांनी 'पद्मश्री' याचबरोबर अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली, होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिवंगत गायक पंकज उदास यांना पद्मभूषण, अरिजीत सिंग, अचूत पालव, वासुदेव कामत, आश्विनी भिडे-देशपांडे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठी रसिकांच्या मना- मनात असणारे सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यांचे मराठी चित्रपटक्षेत्र, नाटक, मालिका यातील योगदान अतूलनिय आहे. आयत्या घरात घरोबा, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी, या गाजलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी विविधरंगी भूमिका साकरल्या आहेत.
केंद्राने आज जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गझल गायक पकंज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दिग्ददर्शक शेखर कपूर यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण १९ जणांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. यापैकी महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेले पद्म पुरस्कार तीन विभागात दिला जातो पद्मविभूषण, पद्मभूषण , पद्मश्री अशा विभागात पुरस्कार दिले जातात. कला, क्रिडा, समाजसेवा, अभियांत्रिकी, शिक्षण, उद्योग, नागरी सेवा, व्यापार, विज्ञान अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांना हे पुरस्कार दिले जातात.