पुढारी ऑनलाईन डेस्क : NEET-UG 2024 परीक्षेतील दोन्ही पर्यायांना गुण दिलेल्या प्रश्न क्रमांक १९ च्या उत्तरावर आपलं मत देण्यासाठी आयआयटी दिल्लीने तज्ज्ञांची समिती तयार करावी, या समितीने मंगळवारी (२३ जुलै) दुपारपर्यंत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी दिले होते. आज झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले, "आम्हाला आयटीआय दिल्लीने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यानुसार प्रश्न क्रमांक १९ च्या प्रश्नाच्या उत्तरासाठी चाैथ्या क्रमाकांचा पर्याय बरोबर आहे."
आयआयटी दिल्लीने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने आज (दि.२३) आपला प्रश्नावरील योग्य पर्यायासंदर्भातील अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. ज्यांना 711 गुण मिळाले, त्यांनी परीक्षेतील एका प्रश्नाला आव्हान दिले हाेते. या प्रश्नासाठी दिलेले पर्याय संदिग्ध होते, असा त्यांचा दावा हाेता. याचिकाकर्त्याच्या मते, एनसीईआरटीच्या नवीन आवृत्तीनुसार या प्रश्नाचा पर्याय 4 हे योग्य उत्तर होते. तथापि, ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय 2 चा पर्याय निवडला त्यांनाही ग्रेस गुण देण्यात आले कारण ते NCERT च्या मागील आवृत्त्यांनुसार योग्य होते.
आयआयटी दिल्लीच्या समितीने प्रश्नाचे परीक्षण केले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला." समितीने स्पष्टपणे असे मत मांडले आहे की, या प्रश्नावर फक्त एकच पर्याय होता, तो पर्याय 4 आहे. त्यामुळे NTA ने आपल्या उत्तर की मध्ये बरोबर होता जो पर्याय 4 होता.