Delhi Crime| दिल्लीतील ५५ वर्षीय वृद्धाला सर्व्हिस ॲपवरून कामवाली बाई मागवणे पडले महागात; ५ लाखांसाठी रचला बलात्काराचा खोटा कट!

दिल्ली पोलिसांनी केली महिलेला अटक, धमकी देऊन उकळले होते २ लाख रुपये
AI genrated Image
AI genrated Image
Published on
Updated on

Online House Services नवी दिल्लीतील व्दारका परिसरातून एक वेगळची घटना समोर आली आहे. एका ५५ वर्षीय व्यक्तिला ॲपवरुन घरकामासाठी बाई बोलवणे महाग पडले आहे. या व्यक्तिने मागवलेल्या कामवाल्या बाईने संबधित व्यक्तीने विनयभंग केला अशी खोटी तक्रार केली. तसेच ५ लाखांची मागणी केली. तक्रारीचा तपास करताना दिल्ली पोलिसांना वेगळीच माहिती समजली, घरकाम करणाऱ्या बाईचा खोटारटेपणा उघडकीस आला पोलिसांनी तात्‍काळ तिला अटक केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की नवी दिल्ली येथील व्दारका हाऊस येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षीय व्यक्तिने एका सर्व्हिस ॲपवरुन ३० जून रोजी घरकामासाठी एका महिलेला बोलावले. संबधित महिला आली तिने घरकाम केले व त्‍यांनंतर तिने पोलिस कंट्रोल रुमला कॉल करुन माझ्यावर बलात्‍कार झाला आहे अशी माहिती दिली. यानंतर त्‍या महिलेने त्‍या व्यक्तिला व त्‍यांच्या परिवाराला बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरवात केली. संबधित व्यक्ति हा गुडगाव येथे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहेत.

५ लाखांची मागणी केली.

यानंतर त्‍या महिलेने या परिवाराला धमकावण्यास सुरवात केली. दाखल केलेली तक्रारीवरुन मी तुमच्यावर बलात्‍काराचा गुन्हा दाखल करणार अशी धमकी देण्यास सुरवात केली. तसेच बदनामी नको असेल व केस नको असेल तर ५ लाख द्या अशी मागणी केली. यानंतर वारंवार पैसे देण्यास दबाव आणण्यास सुरवात केली.

संबधित व्यक्तिच्या मुलाने धाडस दाखवत त्‍या महिलेचा ब्लॅकमेल करतानाचा व्हिडीओ शूट केला. तसेच पैसे देण्याची तयार दखवली व दोन लाख रक्कम देत असतानाचाही व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ पोलिसांना दाखवताच खरी गोष्ट समोर आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता महिलेची तक्रार खोटी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी केली अटक

संबधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तीने घेतलेले धमकी देऊन घेतलेले २ लाखही जप्त केले आहेत. अधिक तपास केला असता या ॲपच्या माध्यमातून ती महिला या घरी अगोदरही कामासाठी आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता संबधित व्यक्तिच्या तक्रारीवरुन कामवाल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन सर्व्हिस ॲप वापरणाऱ्यांसाठी इशारा

या घटनेमुळे अशा प्रकारे ऑनलाईन सेवा ॲप्सद्वारे साफसफाई, दुरुस्ती किंवा इतर घरगुती कामांसाठी अनोळखी व्यक्तींना कामावर ठेवणाऱ्यांसाठी ही घटना एक इशारा ठरली आहे. तज्ञांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये सेवा पुरवठादाराची नेहमी पडताळणी करावी, घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि कोणतीही संशयास्पद परिस्थिती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी महिला यापूर्वी अशाच प्रकारच्या घटनांमध्ये सामील होती का, हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news