ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा : मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांशी चर्चा
Olympic hero Khashaba Jadhav should be honored with Padma Award
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांशी चर्चा Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

'स्वतंत्र भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून भारतीय कुस्तीला नवी उंची मिळवून देणारे पै. स्व. खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेतली. यावेळी खाशाबा जाधव यांच्या कुस्तीसाठीच्या योगदानाची माहिती तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेबद्दलची माहिती मोहोळ यांनी मांडविया यांना दिली.

Olympic hero Khashaba Jadhav should be honored with Padma Award
Wrestler Khashaba Jadhav : खाशाबा जाधव यांची गुगलने दखल घेतली पण, सरकारने नाही : संभाजीराजे

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, 'खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून स्वतंत्र भारताचे ऑलिम्पिकचे खाते उघडले. केवळ कुस्तीच नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्वासाठी हा प्रेरणादायी क्षण होता. अतिशय खडतर परिस्थितीत आणि संघर्ष करत खाशाबा जाधव यांनी मिळवलेले यश दीपस्तंभ ठरले. त्यांच्या या यशाचा गौरव नागरी सन्मानाने होणे आवश्यक वाटते. म्हणूनच या संदर्भात मांडविया यांच्याशी चर्चा केली’.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news