10th Student Pregnancy Case : ओडिशात निवासी शाळेच्या वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थिनीची प्रसूती, मुख्‍याध्‍यापक निलंबित

विरोधकांकडून सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप
10th Student Pregnancy Case : ओडिशात निवासी शाळेच्या वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थिनीची प्रसूती, मुख्‍याध्‍यापक निलंबित
Published on: 
Updated on: 

भुवनेश्वर : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील निवासी शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात शाळेच्‍या मुख्‍याध्‍यापकाला निलंबित करण्‍यात आले आहे.

दरम्‍यान, या घटनेवरून विरोधी बिजू जनता दलाने (बीजेडी) भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदिवासी मुलींच्या सुरक्षिततेबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ही विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. ती शाळेच्या निवासी वसतिगृहात राहत होती. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची प्रसूती होईपर्यंत तिच्या गर्भधारणेबाबत प्रशासनाला माहिती कशी मिळाली नाही, असा सवाल बीजेडीने उपस्थित केला आहे.

बीजेडीच्या आदिवासी विभागाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सुदाम मरांडी यांनी या घटनेतून निवासी शाळांमधील वसतिगृह व्यवस्थापन आणि देखरेखीतील गंभीर त्रुटी उघड झाल्‍याची टीका करत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रकृतीतील बदल आणि गर्भधारणेसारखी बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न मरांडी यांनी उपस्थित केला.

विद्यार्थिनीची प्रसूती झाल्यानंतर केवळ मुख्याध्यापकाला निलंबित करणे पुरेसे नसल्याचेही त्यांनी म्हटले. या प्रकरणात वसतिगृह प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून संपूर्ण यंत्रणेच्या कामकाजाची चौकशी करण्याची गरज असल्याची भूमिका पक्षाने मांडली.

राज्‍य सरकारचे मौन

दरम्यान, या प्रकरणात विद्यार्थिनीच्या गर्भधारणेची पार्श्वभूमी, प्रसूतीची नेमकी परिस्थिती आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत पूर्वकल्पना होती का, यासंबंधी सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. विरोधकांच्या आरोपांवर राज्य सरकारची सविस्तर प्रतिक्रिया मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.