काय सांगता ..? 'या' शहरात आज महिलांना 'ट्रॅफिक' दंड नाही!

रक्षाबंधनानिमित्त नोएडा पोलिसांची खास भेट
Raksha Bandhan
रक्षाबंधनRepresentative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आज रक्षाबंधन. बहिण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असणा-या हा सण देशभरात रक्षाबंधन (raksha bandhan) मोठ्या उत्‍साहात साजरा केला जात आहे. नोएडा वाहतूक ( ट्रॅफिक) पोलिस विभाग यंदा रक्षाबंधन अनोख्‍या पद्धतीने साजरा करणार आहे. महिलांमध्ये वाहतूक जागृती करण्याच्या प्रयत्नाबराेबरच महिलांनी वाहतूक नियम मोडल्‍यास कोणताही दंड न आकारण्‍याचा निर्णय नाेएडा पाेलिसांनी घेतला आहे.

वाहतूक सुरक्षेला चालना देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम

रक्षाबंधनाच्या दिवशी नोएडा ट्रॅफिक पोलिस महिलांमध्ये वाहतूक सुरक्षेला चालना देण्यासाठी शहरातील विविध चौकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्‍यात येणार आहे. तसेच वाहतूक सुरक्षेला चालना देण्यासाठी शहरातील विविध चौकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवणार आहेत. तसेच उपक्रमाचा एक भाग म्हणून महिलांना हेल्मेटचे वाटपही करण्‍यात येणार आहे. आज महिलांना कोणतेही वाहतूक दंड आकारला जाणार नाही. त्यांना दंडाची चिंता न करता त्यांच्या भावांसोबत रक्षाबंधन साजरे करता येईल. मात्र, वाहतूक पोलिसांनी गंभीर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news