'अदानी ग्रीन'ने लाचखोरीचे सर्व आरोप फेटाळले

सर्व शक्य कायदेशीर पावले उचलणार
Adani Green
File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अदानी समूहाने उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावरील अमेरिकेने न्‍यायालयाने केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. गौतम अदानी, सागर अदानी आणि वरिष्ठ कार्यकारी विनीत जैन यांच्यावर अमेरिकेतील फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याचा आरोप लाचखोरीच्या प्रकरणात दाखल करण्‍यात आलेला नाही, असा दावाही अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने एका निवेदनाव्‍दारे केला आहे.

निवेदनात म्‍हटलं आहे की, गौतम अदानी, सागर अदानी आणि श्री. विनीत जैन यांच्यावर अमेरिकेतील फॉरेन करप्‍ट प्रॅक्‍टिसेचस ॲक्‍ट नुसार आरोप करण्‍यात आलेले नाहीत. एफसीपीएचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप खघेटे आहेत. त्यांच्यावर आर्थिक दंड किंवा कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या संचालकांवर तीन गुन्ह्यांसह फौजदारी आरोप ठेवण्यात आले आहेत. हे आरोप अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सर्व कायदेशीर पावले उचलणार असल्याचेही स्‍पष्‍ट केले आहे. गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्या विरोधात यूएस खटल्यात न्याय विभागाच्या वतीने न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टसाठी युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर फौजदारी अभियोग दाखल करण्यात आला आहे. कंपनीने सांगितले की, आरोपपत्रात दंड किंवा शिक्षेबाबत काहीही नमूद केलेले नाही. म्हणजे किती शिक्षा किंवा किती दंड? यावर निर्णय झालेला नाही.

तक्रारीत काय आहेत आरोप ?

अधिकाऱ्यांनी सिक्युरिटी ऍक्ट 1933 आणि सिक्युरिटी ऍक्ट 1934 च्या काही कलमांचे उल्लंघन केले आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप नागरी तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रार प्रतिवादींना दिवाणी आर्थिक दंड भरण्याचे निर्देश देणारा आदेश मागितली असली तरी, त्यात दंडाची रक्कम निश्चित केलेली नाही.

अमेरिकन वकिलांनी अदानी समूहावर कोणते आरोप केले?

अमेरिकन वकिलांनी गौतम अदानी, त्याचा पुतण्या सागर अदानी आणि इतरांवर 2020 ते 2024 दरम्यान सौर ऊर्जा करार घेण्‍यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना $250 दशलक्षपेक्षा जास्त लाच दिल्याचा आरोप केला आहे. अदानी यांच्यावर 2,029 कोटी रुपयांची ($265 दशलक्ष) लाच घेतल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news