

Nitin Gadkari Funny Story:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तसे दिलखुलास व्यक्तीमत्व! नितीन गडकरी जसे त्यांच्या धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध आहेत तसे ते त्यांच्या राजकीय अन् सामाजिक जीवनातील 'किस्से'बाजीसाठी देखील प्रसिद्ध आहेत. नितीन गडकरी हे कोणताही आडपडदा न बाळगता आपल्याला जे सांगायचंय ते सार्वजनिक मंचावरून खुलेआम सांगतात. त्यामुळंच त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची चर्चा होतेच.
असाच एक किस्सा त्यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितला. सध्या या पॉडकास्टमधील त्यांच्या या किस्स्याचे रील सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. यात त्यांनी सावंतवाडीमधील एका टायलेट कमोडवर लावलेल्या प्लास्टिक पेंटबाबतचा किस्सा सांगितला.
नितीन गडकरींनी नुकतेच करिष्मा मेहता या पॉडकास्टरला मुलाखत दिली. या मुलाखतीतील एक किस्सा करिष्मा मेहता यांनी इन्स्टाग्रामवर रीलच्या माध्यमातून शेअर केला. या पोस्टला करिष्मा मेहता यांनी, 'हा रील न हसता बघण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला चॅलेंज देते. जर तुम्ही हसला तर तुम्हाला माहिती आहे की कोणता इमोजी शेअर करायचा आहे..'
या रीलमध्ये नितीन गडकरी यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'त्या सकाळी माझं पोट साफ झालं नव्हतं. मी तसाच विमानात बसलो. एअरपोर्टला उतरलो. गाडीत बसल्यानंतर मला वाटलं की आता लॅटरीनला जायला हवं. मी म्हटलं ज्यावेळी आपण पोहचू त्यावेळी जाऊ. मला प्रेशल आलं होतं. मी सावंतवाडी कधी येतं याची वाट पाहत होतो.'
गडकरी पुढे म्हणाले, 'सावंतवाडी आल्यावर आधी सलामी वगैरे झालं. मी शौचालयात गेलो अन् खाली कमोडवर बसलो. मात्र तिथल्या कमोडच्या प्लास्टिकवर पेंट लावण्यात आला होता. मी त्याला चिकटलो. मला उठताना खूप त्रास झाला. मी कसाबसा उठलो. जर कोणी अधिकारी समोर आला असता तरी मी त्याला मारलंच असतं.'
नितीन गडकरी किस्सा सांगताना पुढे म्हणाले, ' माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. मला खूप वेदना झाल्या होत्या. मी बाहेर आलो अन् सेक्रेटरीला म्हणालो, लोकं कशी मूर्ख असतात. इथला इन-चार्ज कोण आहे. प्लास्टिकवर ऑईल पेंट लावलाय... त्यानंतर तिथला डेप्युटी इंजिनिअर आला. त्या म्हणालो कसा इंजिनिअर झालास. खोटी डिग्री आहे का.. तो म्हणाला मी IIT मधून पास झालोय. प्लास्टिकवर पेंट लावलं तुला अक्कल आहे की नाही. त्यावेळी त्यानं तुम्ही खूप कडक आहात अस सांगण्यात आलं म्हणून सगळीकडं रंग देण्यास सांगितलं होतं. त्यानं सगळंच रगंवलं. चूक झाली. त्यावर मी म्हणालो जा तिथं जाऊन बसा.'
नितीन गडकरींचा हा किस्सा ऐकताना कोणालाही हसू आवरणार नाही. या किस्स्याच्या निमित्तान गडकरी हे किती दिलखुलास आहेत याची प्रचिती येते.