Nishant kumar Yoga : ‘अजब गजब योग’: बिहारच्या आरोग्यमंत्र्यांचा योग दिनाचा व्हिडीओ होतोय व्हायरल!

व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर उमटेल स्मितहास्य, नेटकऱ्यांचा कमेंटचा पाऊस
Nishant kumar Yoga
Nishant kumar Yoga
Published on
Updated on

bihar health minister २१ जून रोजी पार पडलेल्या 'आंतरराष्ट्रीय योग दिना'निमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील नेते, सेलिब्रीटी, अभिनेते यांनी योग प्रात्‍यक्षिके केली. पण यामध्ये सर्वात जास्त व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ते म्हणजे बिहारचे आरोग्य मंत्री निशांत कुमार यांचे, निशांत कुमार हे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र आहेत. यामध्ये त्‍यांची योगासने पाहून अनेकांना हसू फूटले आहे. तर अनेक जण त्‍यांच्यावर टीका करत आहेत.

यापूर्वीही अनेक वेळा निशांत कुमार यांच्या आरोग्यावरुन चांगलेच व्हायरल झाले आहेत. आता योग दिनी त्‍यांची योग प्रात्‍यक्षिके पाहून अनेकजण कमेंट करत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांच्या अजब-गजब योग मुद्रा पाहून नेटीझन्समध्ये हशा पिकला आहे. आरोग्यमंत्री इतका वाईट योग करत असतील तर बाकीच्यांच काय असे सवाल उपस्थित होत आहेत.

योग दिनानिमित्त पाटणा येथील कंकडबाग येथील पाटलिपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एका भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, केंद्रीय मंत्री ललन सिंग आणि राज्याचे आरोग्य मंत्री निशांत कुमार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सर्व नेते स्टेजवर योग शिक्षकाच्या सूचनांचे पालन करत योगासने करत होते.

नेमके काय घडले ?

योग शिक्षक जशा सूचना देत होते, त्याप्रमाणे आजूबाजूचे सर्व नेते आणि नागरिक हात-पाय हलवून योग्य मुद्रा करत होते. मात्र, कॅमेरा जेव्हा आरोग्य मंत्री निशांत कुमार यांच्याकडे फिरला, तेव्हा त्यांची योगासने पाहून अनेकजण चकीत झाले.

इन्स्ट्रक्टरने हात वर करायला सांगितल्यावर त्यांचे हात वेगळ्याच दिशेने जात होते.

डावीकडे-उजवीकडे वळताना आणि खाली वाकताना त्यांचा ताळमेळ पूर्णपणे बिघडलेला दिसला.

अनेक ठिकाणी ते चुकीच्या आणि अजब मुद्रा करताना कॅमेऱ्यात कैद झाले

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच काही वेळातच ट्रेंड होऊ लागला. विरोधकांसह सर्वसामान्यांनीही ‘आरोग्य मंत्र्यांचीच फिटनेस अशी असेल तर राज्याचे काय?’ अशा शब्दांत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी गमतीने ‘इन्होंने तो बाबा रामदेव को भी फेल कर दिया’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

निशांत कुमार यांच्याविषयी

निशांत कुमार हे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र आहेत. ते मूळचे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून राजकारणापासून दूर होते. मात्र, मार्च २०२६ मध्ये त्यांनी जेडीयू (JDU) पक्षात प्रवेश केला आणि मे २०२६ मध्ये त्यांनी बिहारचे आरोग्य मंत्री म्हणून शपथ घेतली. राजकारणात आल्यापासून त्यांचे अनेक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news