New Cloud Mythos AI: नव्या AI मॉडेलमुळं सरकारची उडाली झोप... अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतला मोठा निर्णय

New Cloud Mythos AI
New Cloud Mythos AIpudhari
Published on
Updated on

New Cloud Mythos AI: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इलेक्ट्रॉनिक अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरूवारी बँक आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या धोक्याबाबत चर्चा करण्यात आली. नुकतेच अमेरिकेची कंपनी एन्थ्रोपिकने एक नवीन AI Mythos लाँच केले आहे. त्यामुळं संपूर्ण जगतात भूकंप आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या नव्या AI मॉडेलचा बँकिंग आणि फायनान्स सिस्टमच्या डेटाला देखील धोका होऊ शकतो. असा दावा केला जातोय की या AI मॉडेलने अनेक मोठ्या ऑपरेटिंग सिस्टममधील त्रुटी शोधून काढल्या आहेत. त्यामुळं भविष्यात हे मॉडेल अजूनच धोकादायक होऊ शकते. हे मॉडेल पुढे बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या पैशापर्यंत देखील आपली पोहोच निर्माण करू शकतो. या गोष्टी लक्षात आल्यानंतर सरकारची झोप उडाली आहे. त्यांनी त्वरित एक बैठक बोलावली.

New Cloud Mythos AI
Algorithm | ‘विघातक अल्गोरिदम’ला दणका

आरबीआय आणि बँकांसोबत गंभीर चर्चा

दोन्ही मंत्र्यांनी आरबीआय आणि बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी एंथ्रोपिक क्लाऊड मिथोस मॉडेलच्या संभाव्य धोक्याबाबत आणि सायबर सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली.

अर्थ मंत्रालयाने सांगितलं की सीमारमण यांनी क्लाऊड मिथोसच्या संभाव्य प्रभाव आणि त्याच्याबाबत इशारा दिला आहे. पोस्टमध्ये सांगितलं गेलं आहे की हा एक अभूतपूर्व धोका आहे. त्यासाठी आर्थिक संस्था आणि बँकांच्या उच्चस्तरीय सतर्कता, तयारी आणि चांगलं काम याची गरज आहे.'

New Cloud Mythos AI
iran israel war: अत्याधुनिक रणसंग्रामाचा थरार

काय आहे 'क्लाउड मिथोस'?

'क्लाउड मिथोस' हे एआय स्टार्टअप अँथ्रोपिक (Anthropic) ने विकसित केलेले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल आहे. कंपनीच्या मते, हे मॉडेल सायबर सुरक्षेच्या बाबतीत इतके प्रगत आणि शक्तिशाली आहे की ते सर्वसामान्यांसाठी खुले करणे धोक्याचे ठरू शकते.

या मॉडेलची खास वैशिष्ट्ये:

२७ वर्षांनंतर शोधल्या त्रुटी: मिथोसने प्रमुख ऑपरेटिंग सिस्टिम्स आणि वेब ब्राउझरमधील अशा हजारो सायबर सुरक्षा त्रुटी (Vulnerabilities) शोधून काढल्या आहेत, ज्या गेल्या २७ वर्षांपासून कोणाच्याही लक्षात आल्या नव्हत्या.

हॅकिंगचा धोका: अँथ्रोपिकच्या मते, हे मॉडेल सर्वांसाठी उपलब्ध करून देणे म्हणजे लॅपटॉप वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात प्रगत हॅकिंगची शक्ती देण्यासारखे आहे. हे मॉडेल अशा सुरक्षा त्रुटींचा फायदा घेऊ शकते ज्यांच्याबद्दल जगाला अद्याप काहीच माहिती नाही.

मर्यादित प्रवेश: सध्या केवळ अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या ४० निवडक कंपन्यांनाच या मॉडेलचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सुरक्षेचा पेच: काही अहवालांनुसार, अनरजिस्टर्ड युजर्सच्या एका गटाने या मॉडेलपर्यंत प्रवेश मिळवला आहे, ज्यामुळे सायबर सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

New Cloud Mythos AI
Global Internet | स्ट्रेट ऑफ होर्मुझ : डिजिटल 'चोकपॉईंट', जगाच्या इंटरनेटला धोका

काय आहे सरकारची योजना?

'मिथोस' हे मॉडेल इतके शक्तिशाली आहे की, त्याचा वापर करून कोणताही हॅकर मोठे बँकिंग नेटवर्क किंवा वित्तीय संस्थांचे सिस्टीम हॅक करू शकतो. हा धोका लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ मंत्रालयाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाचे निर्णय आणि उपाययोजना:

सुरक्षित इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती: अर्थ मंत्रालय अशा एका प्रगत 'इन्फ्रास्ट्रक्चर'वर काम करत आहे, जे एआयच्या मदतीने होणाऱ्या हॅकिंगच्या प्रयत्नांना त्वरित ओळखून त्यावर प्रभावी कारवाई करेल.

बँकांना सतर्कतेचे आदेश: बैठकीदरम्यान निर्मला सीतारमण यांनी सर्व बँकांना त्यांचे IT सिस्टीम अधिक मजबूत करण्याचे आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

रिअल-टाइम डेटा शेअरिंग: बँका, @IndianCERT आणि इतर सुरक्षा यंत्रणांमध्ये 'रिअल-टाइम'मध्ये धोक्यांची माहिती शेअर करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा (Mechanism) उभारली जाणार आहे.

इंटेलिजन्स नेटवर्क: या यंत्रणेच्या माध्यमातून एखाद्या बँकेवर सायबर हल्ला झाल्यास, त्याची माहिती त्वरित संपूर्ण भारतीय बँकिंग सिस्टीममध्ये शेअर केली जाईल, जेणेकरून इतर बँका वेळीच सावध होऊ शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news