देशातील 'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये IIT मद्रास 'टॉप'

सलग पाचव्‍या वर्षी अग्रस्‍थान कायम, मुंबई IIT तिसर्‍या स्‍थानी
NIRF Ranking 2024
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शिक्षण मंत्रालयाने आज (दि.१२) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे ‘नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’(एनआयआरएफ) जाहीर झाले आहे. IIT मद्रासने देशातील सर्वोच्च दर्जाची उच्च शिक्षण संस्था म्हणून रँक केले आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बेंगळुरू), IIT-बॉम्बे आणि IIT-दिल्ली हे अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चाैथ्‍या स्‍थानी आहेत, असे वृत्त ANIने दिले आहे.

यंदा मूल्यांकनाच्या निकषांमध्येही बदल करण्यात आला आहे. वैद्यकीय संस्थांमध्ये प्राध्यापक ते विद्यार्थी गुणोत्तर 1:15 वरून 1:10 करण्यात आले आहे आणि राज्य सरकारी विद्यापीठांमध्ये 1:15 वरून 1:20 पर्यंत वाढविण्यात आले आहे. रँकिंग फ्रेमवर्क संस्थांचे मूल्यांकन करताना अध्यापन, शिक्षण आणि संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक सराव, पदवीचे परिणाम आणि सर्वसमावेशकता आदींचा समावेश होता. उच्च शैक्षणिक संस्था 16 श्रेणींमध्ये सूचीबद्ध आहेत. त्‍यामध्‍ये विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कायदा, आर्किटेक्चर, महाविद्यालये, संशोधन संस्था, फार्मसी, दंत, कृषी आणि संबंधित क्षेत्रे, राज्य अनुदानीत सरकारी विद्यापीठे, कौशल्य विद्यापीठे, मुक्त विद्यापीठे आणि नवोपक्रम. गेल्या वर्षी, NIRF मध्ये तब्बल 5,543 उच्च शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरूला सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्थान मिळाले आहे. आयआयटी-मद्रासला गेल्या 8 वर्षांपासून सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणूनही स्थान मिळाले आहे. व्यवस्थापन प्रकारात आयआयएम-अहमदाबाद, बंगळुरू आणि कलकत्ता या पाच शहरांचा समावेश आहे.

अभियांत्रिकी शिक्षण देणार्‍या देशातील अग्रस्‍थानी असणार्‍या संस्था

1) IIT मद्रास 2) आयआयटी दिल्ली 3) आयआयटी मुंबई 4) आयआयटी कानपूर 5)IIT खरगपूर 6) आयआयटी रुरकी 7) आयआयटी गुवाहाटी 8) आयआयटी हैदराबाद 9) एनआयटी तिरुचिरापल्ली 10) IIT-BHU वाराणसी

IISc बंगळूर सर्वोत्तम भारतीय विद्यापीठ

या वर्षी AIIMS दिल्ली वैद्यकीय श्रेणीत अव्वल ठरली आहे. त्याचबरोबर हिंदू कॉलेजने यंदा कॉलेज प्रकारात अव्वल क्रमांक पटकावला आहे. आयआयएम अहमदाबाद व्यवस्थापन श्रेणीत अव्वल ठरले आहे. IISc बंगळूरची सर्वोत्तम भारतीय विद्यापीठ म्हणून, IIT मद्रासची सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था म्हणून निवड करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news