IASV Triveni | ३१४ दिवस...२५,५०० सागरी मैल

लष्करी महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक ‘समुद्र प्रदक्षिणा’ फत्ते
मुंबई : ‘आयएएसव्ही त्रिवेणी’वरून यशस्वी जलपरिक्रमा मोहीम पूर्ण केल्यानंतर (डावीकडून उजवीकडे) स्क्वॉड्रन लीडर श्रद्धा पी राजू (उपकर्णधार), लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर (कर्णधार), स्क्वॉड्रन लीडर वैशाली भंडारी, लेफ्टनंट कमांडर प्रियंका गुसैन, मेजर प्राजक्ता निकम, स्क्वॉड्रन लीडर अरुवी जयदेव, विंग कमांडर विभा सिंग, मेजर ओमिता दळवी आणि मेजर करमजीत कौर.
मुंबई : ‘आयएएसव्ही त्रिवेणी’वरून यशस्वी जलपरिक्रमा मोहीम पूर्ण केल्यानंतर (डावीकडून उजवीकडे) स्क्वॉड्रन लीडर श्रद्धा पी राजू (उपकर्णधार), लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर (कर्णधार), स्क्वॉड्रन लीडर वैशाली भंडारी, लेफ्टनंट कमांडर प्रियंका गुसैन, मेजर प्राजक्ता निकम, स्क्वॉड्रन लीडर अरुवी जयदेव, विंग कमांडर विभा सिंग, मेजर ओमिता दळवी आणि मेजर करमजीत कौर.
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : भारतीय भूदल, नौदल आणि वायुसेनेच्या नऊ महिला अधिकाऱ्यांनी 'आयएएसव्ही त्रिवेणी' या स्वदेशी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणा मारण्याचा अभूतपूर्व विक्रम केला आहे. ३१४ दिवसांच्या खडतर आणि ऐतिहासिक प्रवासानंतर या वीरांगनांचे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत २५,५०० सागरी मैलांचे अंतर पार करण्यात आले. 'आयएएसव्ही त्रिवेणी'ने चार महासागर पार करत आणि दोनदा विषुववृत्त ओलांडून तिन्ही 'ग्रेट केप्स' (केप लीविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप) ला प्रदक्षिणा घातली. या मोहिमेदरम्यान भारतीय महिला अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये महत्त्वपूर्ण राजनैतिक भेटही दिली.

शास्त्रीय संशोधन, जनजागृती

केवळ प्रवास न करता या महिला अधिकाऱ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या सहकार्याने सागरी पर्यावरणावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. महासागरातील सूक्ष्म प्लास्टिकचा अभ्यास करणे आणि सागरी जीवांचे दस्तऐवजीकरण करून सागरी आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य या टीमने केले.

ऐतिहासिक कामगिरी

तिन्ही सैन्य दलांच्या (भूदल, नौदल, वायुसेना) नऊ महिला अधिकाऱ्यांनी ३१४ दिवसांत २५ हजार ५०० सागरी मैलांची पहिली त्रिसत्ताक ‘समुद्र प्रदक्षिणा’ यशस्वीपणे पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news