Kuno National Park | बोत्स्वानाहून ‘कुनो’मध्ये आले 9 नवीन चित्ते

‘प्रोजेक्ट चित्ता’ला बळ : देशात चित्त्यांची संख्या झाली 48
Kuno National Park |
Kuno National Park | बोत्स्वानाहून ‘कुनो’मध्ये आले 9 नवीन चित्तेFile Photo
Published on
Updated on

शिओपूर (मध्य प्रदेश); वृत्तसंस्था : भारतातील चित्त्यांच्या पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत शनिवारी आफ्रिकेतील बोत्स्वाना देशातून 9 नवीन चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सुखरूप दाखल झाले आहेत. या नवीन पाहुण्यांमुळे भारतातील चित्त्यांची एकूण संख्या आता 48 झाली आहे. हे चित्ते भारतीय हवाईदलाच्या विशेष विमानाने बोत्स्वानाहून ग्वाल्हेरला आणले गेले आणि तिथून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे कुनो येथे पोहोचवण्यात आले. केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत या चित्त्यांना क्वारंटाईन कक्षात सोडण्यात येणार आहे.

चित्ता पुनर्वसन प्रकल्पांतर्गत आफ्रिकेतून आलेली ही तिसरी खेप आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून आणि फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणण्यात आले होते. कुनो नॅशनल पार्कचे संचालक उत्तम शर्मा यांनी सांगितले की, ‘या नवीन चित्त्यांमुळे प्रकल्प अधिक मजबूत होईल. केंद्र सरकारच्या मदतीने ही संख्या लवकरच 50 वर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे.’

प्रकल्पाचे महत्त्व : जगातील सर्वात वेगवान प्राणी असलेला चित्ता भारतातून सुमारे 70 वर्षांपूर्वी नामशेष झाला होता.

एकाच ठिकाणी सर्व चित्ते ठेवल्यास रोगांचा प्रादुर्भाव होऊन संपूर्ण संख्या नष्ट होण्याचा धोका असतो म्हणून त्यांना विविध अधिवासांमध्ये विभागण्याचे धोरण प्रशासन राबवत आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये आहेत 36 चित्ते

कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्या 36 चित्ते आहेत, तर सुरक्षिततेच्या कारणास्तव 3 चित्त्यांना गांधी सागर अभयारण्यात हलवण्यात आले आहे. 2023 पासून आतापर्यंत कुनोमध्ये एकूण 39 बछड्यांचा जन्म झाला आहे, ज्यापैकी 27 बछडे सध्या जिवंत आणि सुखरूप आहेत. या वर्षात 7 ते 18 फेब्रुवारीदरम्यान दोन वेगवेगळ्या माद्यांकडून 9 बछड्यांचा जन्म झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news