तामिळनाडू रेल्वे अपघातस्‍थळाची 'एनआयए' पथकाने केली पाहणी

Tamil Nadu train accident : 'आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होणार ? : राहुल गांधी
Tamil Nadu train accident
तामिळनाडूच्‍या कावराईपेट्टईजवळ अपघातग्रस्‍त डब्‍बे आज सकाळी हटविण्‍यात आले.(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडूच्‍या कावराईपेट्टईजवळ शुक्रवारी (दि. ११) रात्री म्हैसूरहून दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस आणि मालगाडी अपघातात झाला हाेता. आज (दि.१२) राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (एनआयए) अधिकार्‍यांनी अपघातस्‍थळी भेट देवून पाहणी केली. (Tamil Nadu train accident)

बिहारच्या दरभंगा येथे ११ ऑक्‍टोबर (शुक्रवारी) रात्री साडेआठच्‍या सुमारास बागमती एक्स्प्रेसने पाठीमागून मालगाडीला धडक दिली. एक्‍सप्रेसचे डब्‍बे रूळावरून घसरले. या भीषण अपघातात १९ प्रवासी जखमी झाले होते. सर्व जखमी प्रवाशांना रूग्‍णालयात भरती करण्यात आले. यातील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. दक्षिण रेल्‍वेकडून या अपघाताची उच्चस्‍तरीय चौकशी सुरू केली आहे. दरम्‍यान, आज (दि.१२) राष्‍ट्रीय तपास संस्‍थेच्‍या (एनआयए) अधिकार्‍यांनी अपघातस्‍थळी भेट देवून पाहणी केली.

'आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होणार ? राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

अनेक रेल्‍वे अपघातात शेकडो जीव गमवावे लागले तरी धडा घेतलेला नाही, अशा शब्‍दांमध्‍ये तामिळनाडूतील रेल्‍वे अपघातानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.राहुल गांधी यांनी आपल्‍या सोशल मीडियावरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, देशात रेल्‍वेचे अनेक अपघात होऊन जिवीतहानी होऊनही बोध घेतलेला नाही. याची जबाबदारी वरच्यावर सोपवली पाहिजे. या सरकारला जाग येण्यापूर्वी आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होतील, असा सवालही त्‍यांनी केला.

अपघातातबाबत दक्षिण रेल्‍वेचे महाप्रबंधक आर एन सिंह यांनी सांगितले होते की, रेल्‍वेला कावरपेट्टई स्‍टेशनवर थांबायचे नव्हते. चैन्नईहून रवाना झाल्‍यानंतर रेल्‍वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. ड्रायव्हर सिग्‍नलचा योग्‍य पद्धतीने पालन करत होता. मात्र रेल्‍वे मुख्य लाईन सोडून लूप लाईनवर गेली. अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्‍यान तमिळनाडूमध्ये झालेल्‍या रेल्‍वे दुर्घटनेमुळे ओडिशा रेल्‍वे अपघाताची आठवण झाली. २ जून २०२३ रोजी ओडिशाच्या बालासोर मध्ये मोठा रेल्‍वे अपघात झाला होता. हा अपघातही अशाच पद्धतीने झाला होता. मात्र बालासोर रेल्‍वे अपघातामध्ये जवळपास २९० लोकांचा जीव गेला होता. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news