Waqf Act | वक्फ कायदा लागू; अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयातकडून अधिसूचना जारी

आजपासून देशभरात नवीन वक्फ सुधारणा कायदा
Waqf Amendment Act
आजपासून देशभरात नवीन वक्फ सुधारणा कायदा लागू झाला आहे. File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : आजपासून देशभरात नवीन वक्फ सुधारणा कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वक्फ कायदा 8 एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातच संसद आणि राष्ट्रपतींनी वक्फ सुधारणा कायद्याला मान्यता दिली होती. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा मंत्रालयाने 5 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली होती. तथापि, त्याच्या अंमलबजावणीची तारीख नमूद केलेली नाही. आजच्या अधिसूचनेत त्याची तारीखदेखील देण्यात आली आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे की, केंद्र सरकार, वक्फ (सुधारणा) कायदा, 2024 च्या कलम 1 च्या उपकलम (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, 8 एप्रिल ही त्याची प्रभावी तारीख म्हणून घोषित करते. याचा अर्थ असा की, आतापासून हा कायदा देशभरात लागू झाला आहे. हे उल्लेखनीय आहे की, लोकसभेने दीर्घ चर्चेनंतर 3 एप्रिल रोजी हे विधेयक मंजूर केले होते. येथे 288 खासदारांनी त्याच्या बाजूने मतदान केले, तर 232 खासदारांनी विरोधात मतदान केले; तर 4 एप्रिल रोजी राज्यसभेने हे विधेयक 128 मतांनी आणि विरोधात 95 मतांनी मंजूर केले. यानंतर, राष्ट्रपतींनी 5 एप्रिल रोजी त्याला मान्यता दिली. सरकारने असा दावा केला की, या विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि या समुदायातील महिलांची स्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल. त्याचवेळी, देशातील बहुतेक मुस्लिम संघटना वक्फ कायद्याविरुद्ध सतत निषेध करत आहेत.

दुसरीकडे, वक्फ कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एकूण 10 हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये खासदार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमियत उलेमा-ए-हिंद यांच्या याचिकांचा समावेश आहे. या याचिकांमध्ये, नव्याने बनवलेल्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. याबाबत केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news