Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड; गणवेशाला खिसे नसतील

अयोध्येतील राम मंदिर येथे देणगी मोजणीतील कथित अनियमिततांबाबत सुरू असलेल्या एसआयटी चौकशीचा परिणाम आता व्यवस्थापनावरही दिसून येत आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड; गणवेशाला खिसे नसतीलfile photo
Published on
Updated on

New dress code for employees counting donations at the Ram Mandir; uniforms will not have pockets

पुढारी ऑनलाईन : अयोध्येतील राम मंदिर येथे देणगी मोजणीतील कथित अनियमिततांबाबत सुरू असलेल्या एसआयटी चौकशीचा परिणाम आता व्यवस्थापनावरही दिसून येत आहे. चौकशीदरम्यान बँक व्यवस्थापनाने देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला असून, आता या कर्मचाऱ्यांना खिसेविरहित गणवेश परिधान करावा लागणार आहे.

Ayodhya Ram Mandir
Death Registration Data | गरज आमूलाग्र सुधारणांची समाजभान

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील राम मंदिरातील देणगी प्रकरणाच्या एसआयटी चौकशीदरम्यान करारातील नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. चौकशीच्या कक्षेत आलेल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्यात आले असून, बँक व्यवस्थापनाने मोजणी कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत.

राम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी एका टीव्ही मुलाखतीत यासाठी थेट बँक व्यवस्थापनालाच जबाबदार धरले होते. त्यांच्या मते, करारामध्ये स्पष्ट नियम असताना मोजणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे पालन का केले नाही, हा प्रश्न आहे.

माहितीनुसार, मोठ्या ग्राहकाच्या कामासाठी बँकेने वाराणसीतील एका आउटसोर्सिंग कंपनीमार्फत श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. या कर्मचाऱ्यांचे वेतनही त्याच कंपनीमार्फत दिले जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ९० टक्के नियुक्त्या ट्रस्टमधील काही पदाधिकाऱ्यांच्या प्रभावामुळे झाल्या होत्या. तसेच वेळोवेळी नियमांमध्ये शिथिलताही त्यांच्याच शिफारशीवर देण्यात आली होती.

बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा करार दोन्ही बाजूंनी झाला होता; बँकेने स्वतःहून कर्मचारी लादले नव्हते. अशा संवेदनशील कामासाठी बँकेचे नियमित कर्मचारीच नियुक्त असणे अपेक्षित होते.

राम मंदिरातील कर्मचारी समाजापासून दूर

राम मंदिराशी संबंधित महत्त्वाची माहिती माध्यमांमध्ये लीक झाल्यानंतर मंदिर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. आता कर्मचारी मंदिरासंबंधी कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन घेऊन मंदिर परिसरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir
मंदिराच्या दानपेटीत २० रुपयांची नोट सापडली; त्यावर लिहिले होते... "माझ्या सासूला लवकर मरण येऊ दे."

याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही माध्यमांशी किंवा अपरिचित व्यक्तींशी बोलू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते. यामागे एसआयटी चौकशीची भीती असल्याचे मानले जात आहे.

माध्यमांशी बोलण्यास बंदी

गेल्या काही दिवसांत राम मंदिराशी संबंधित अनेक गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत पोहोचत असल्याने ही माहिती नेमकी कुठून बाहेर जात आहे, याचा शोध मंदिर प्रशासनाला लागत नव्हता. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे.

कर्मचाऱ्यांना माध्यमांशी संवाद साधण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली असून, त्यामुळे ते राम मंदिराबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळत आहेत. पूर्वी कधीकधी फोनवर बोलणारे कर्मचारी आता फोन घेणेही टाळत असल्याचे दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही माध्यमे किंवा अपरिचित व्यक्तींशी कोणतीही चर्चा करू नये, असे सांगितले आहे. माध्यमांशी बोलल्यास स्वतःलाही एसआयटी चौकशीला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

दुसरीकडे, एसआयटी चौकशीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये विविध शंका आणि चिंता आहेत. चौकशीसाठी बोलावले गेल्यास आपली बाजू कशी मांडायची, याबाबतही ते संभ्रमात आहेत. दररोज या प्रकरणात नवे तपशील समोर येत असल्याने कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news