NEET UG 2024 निकाल राज्‍य आणि केंद्रनिहाय जाहीर

सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले हाेते आदेश, आता सोमवारच्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
NEET UG 2024 Result
NEET UG 2024 परीक्षेचा शहर आणि केंद्रनिहाय निकाल आज (दि.२०) पुन्‍हा घोषित करण्‍यता आला. Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : NEET UG 2024 परीक्षेचा राज्‍यनिहाय आणि केंद्रनिहाय निकाल आज (दि.२०) घोषित करण्‍यात आला. नीट पेपरफुटी व वाढीव गुणांविरोधात १८ जुलै रोजी झालेल्‍या सुनावणीदरम्‍यान सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशानुसार हा निकाल जाहीर करण्‍यात आला आहे. परीक्षार्थी नीट परीक्षेचा राज्‍य आणि केंद्रनिहाय निकाल अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET/ वर डाउनलोड करू शकतात. दरम्‍यान, सोमवार, २२ जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालय अंतिम निकाल देण्याची अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांची ओळख गुप्‍त ठेवण्‍याची सूचना

'एनटीए'ने NEET-UG 2024 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवावी आणि शहर व केंद्रानुसार निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावा. तसेच बिहार पोलिसांनी आपल्‍या तपास अहवालाची प्रत सादर करावी, असे निर्देश18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एनटीएला दिले होते. आता सोमवार, २२ जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालय अंतिम निकाल देण्याची अपेक्षा आहे.

NEET UG 2024 Result
'नीट' पेपरफुटी प्रकरणी पाटणा 'एम्स'चे चार विद्यार्थी 'सीबीआय'च्‍या ताब्यात

काय म्हणाले होते सर्वोच्‍च न्‍यायालय ?

  • पेपरफुटीमुळे मोठ्या प्रमाणात परीक्षेचे पावित्र्य नष्ट झाल्याचे समोर आले तरच आम्ही फेरपरीक्षेचा निर्णय घेऊ.

  • 23 लाख विद्यार्थ्यांपैकी 1 लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याने याचिकाकर्त्यांनी सिद्ध करावे की, पेपरफुटी पद्धतशीर झाली आणि त्याचा एकूणच परीक्षेवर परिणाम झाला.

  • पाटणा आणि हजारीबागमध्ये पेपर फुटला आणि तो पसरवला गेला. ही पेपरफुटी फक्त त्याच केंद्रांपुरती होती की देशभर होती, हे बघायचे आहे.

  • विद्यार्थ्यांना निकालच माहिती नसल्याने ते असहाय आहेत. विद्यार्थ्यांची ओळख जाहीर न करता केंद्रनिहाय, शहरनिहाय निकाल जाहीर करा, त्यातून गुणांचा पॅटर्न समोर येईल.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

एनटीएने जाहीर केलेल्या या निकालात प्रत्येक राज्यातील कोणत्या शहरांमध्ये नीट परीक्षा घेतली गेली? या शहरांमध्ये किती परिक्षा केंद्र होते? त्या परिक्षा केंद्रावर किती विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली? असा तपशील या निकालावरुन समजत आहे. नीट परिक्षा कथित पेपरफुटी प्रकरणी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परिक्षा रद्द करायची का नाही? यावर या सुनावणीत निकाल येण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news