

NEET UG 2025 Result : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (NTA) ने घेतलेल्या NEET UG 2025 चा निकाल आज (दि. १४) जाहीर करण्यात आला. निकालांसोबत टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार neet.nta.nic.in ला भेट देऊन आपला निकाल पाहू शकतात. यावर्षी NEET UG परीक्षा सुमारे 20.8 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती.
यंदा नीट यूजी परीक्षेत राजस्थानच्या महेश कुमारने ऑल इंडिया फर्स्ट रँक मिळवून NEET UG 2025 मध्ये अव्वल ठरला आहो. मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा आणि महाराष्ट्राच्या कृषांग जोशीने तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुलींमध्ये अविका अग्रवाल सर्वाधिक गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले अहो. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनीही या टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) NEET UG 2025 साठी सर्व श्रेणींसाठी कटऑफ गुण जाहीर केले आहेत. या वर्षी खुला प्रवर्ग आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी कटऑफ गुण 686 ते 144 दरम्यान निश्चित केले आहेत. याशिवाय ओबीसी, एसी आणि एसटी श्रेणींसाठी NEET UG 2025 चा कटऑफ गुण 143 ते 113 दरम्यान निश्चित केला आहे.
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या.
“NEET UG 2025 निकाल” या लिंकवर क्लिक करा.
तुमचा प्रवेशपत्र क्रमांक आणि जन्मतारीख यासारखे क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करु शकता.