"हे निंदनीय आहे..." : 'नीट' प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी सरन्‍यायाधीश असं का म्‍हणाले?

युक्‍तीवादावेळी अचानक हस्‍तक्षेप करणार्‍या ॲड नेदुमपार यांना फटकारले
NEET 2024
नीट प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी आज (दि.23) सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ज्‍येष्‍ठ वकील ॲड मॅथ्यूज नेदुमपारा यांना चांगलेच सुनावले.X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्‍या जाणार्‍या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.23) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ज्‍येष्‍ठ वकील ॲड मॅथ्यूज नेदुमपारा यांना चांगलेच सुनावले. या वेळी ॲड. नेदुमपारा यांच्‍या वर्तनावर संतापलेल्‍या सरन्‍यायाधीशांनी त्‍यांची कृती ही निंदनीय असल्‍याचेही स्‍पष्‍ट केले.

नेमकं काय घडलं?

नीट परीक्षा वादावरुन दाखल याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. आज याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा युक्‍तीवाद करत होते. यावेळी अचानक ॲड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनी हस्तक्षेप केला. मला काही सांगायचे आहे, असे म्‍हणाले. यावेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगतले की, मी तुम्हाला नरेंद्र हुडा यांचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर बोलण्‍याची संधी देईन. यावर मी येथे सर्वात ज्येष्ठ आहे, असे नेदुमपारा यांनी सांगितले. त्‍यांच्‍या या भाषेवर सरन्‍यायाधीश चंद्रचडू यांनी त्‍यांना चांगलेच सुनावले.

मी वकिलांना या कोर्टात प्रक्रिया ठरवू देऊ शकत नाही

ॲड. हुडा युक्‍तीवाद करत असताना अचानक ॲड. मॅथ्यूज नेदुमपारा यांनी हस्तक्षेप केला. यावर सरन्‍यायाधीश चंद्रचूड म्‍हणाले की, श्रीमान नेदुमपारा, मी तुम्हाला चेतावणी देत ​​आहे. तुम्‍हाला गॅलरीतून बोलता येणार नाही. हुडा यांचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर मी तुम्‍हाला तुमचे म्‍हणण मांडण्‍यासाठी पूर्ण वेळ देईन. मात्र तरीही ॲड. मॅथ्यूज नेदुमपारा बाेलत राहिले. यावर सरन्‍यायाधीश चंद्रचूड चांगलेच भडकले. ते म्‍हणाले,"मी न्यायालयाचा प्रभारी आहे. सुरक्षा रक्षकांना बोलवा त्‍यांना येथून चालते करा." यावर ॲड. नेदुमपारा यांनी मी जातोय, असे सांगतले. तुम्हाला असे सांगयाची गरज नाही. तुम्‍ही न्‍यायालय सोडू शकता, मी गेल्या २४ वर्षांपासून न्यायव्यवस्था पाहिली आहे. मी वकिलांना या कोर्टात प्रक्रिया ठरवू देऊ शकत नाही, असेही सरन्‍यायाधीशांनी ॲड. नेदुमपारा यांना सुनावले. यावर मी नेदुमपार यांनीही प्रत्‍युत्तर दिले. मी १९७९ पासून न्‍यायालयीन कामकाज पाहत असल्‍याचे म्‍हटले. यानंतर मात्र सरन्‍यायाधीशांचा संताप अनावर झाला. मला आदेश जारी करावे लागतील ते योग्‍य हेणार नाही, हे निंदनीय आहे, अशा शब्‍दांत त्‍यांनी आपला संताप व्‍यक्‍त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news