पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा अमेरिका दौरा पूर्ण करून भारतात परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेले करार आणि दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवादाची अमेरिकन माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. 'सीएनएन'ने पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक केले असून, त्यांना उत्तम संवादक असे संबोधले आहे. पंतप्रधान मोदींनी आव्हानाचे संधीत रूपांतर केले, असेही म्हटलं आहे. ( Narendra Modi's US visit)
'सीएनएन'चे वरिष्ठ पत्रकार विल रिप्ले यांनी म्हटलं आहे की, यापूर्वी ट्रम्प यांची जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्याशी पहिली भेट सकारात्मक झाली आहे. आता ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची भेटही खूप सकारात्मक होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद कसा साधावा, त्यांच्याशी वाटाघाटी कशा कराव्यात याबद्दल जगभरातील नेत्यांसाठी हा एक मास्टरक्लास आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी आयत शुल्कावर बोलले होते. यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील बैठक झाली. भारतीय पंतप्रधानांना परिस्थिती समजली. प्रतिकूल परिस्थिती असूनही, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चांगली चर्चा झाली आणि व्यापार, ऊर्जा, लष्कर इत्यादी मुद्द्यांवर महत्त्वाचे करार झाले."
बैठकीनंतर आम्हाला दिसले की दोन्ही नेत्यांमधील भेटीचे आनंददायी परिणाम झाले. दोन्ही देश व्यापार करारावर वाटाघाटी करतील. अमेरिका भारताच्या अणु क्षेत्रात गुंतवणूक करेल आणि दोन्ही देश एफ-३५ जेटवरही चर्चा करतील. याचा फायदा दोन्ही देशांना झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हानाचे संधीत रुपांतर केले, असेही विल रिप्ले यांनी नमूद केले आहे.
बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संवाद कौशल्य क्षमतेचे कौतुकही केले. ट्रम्प यांना विचारण्यात आले की, कोण चांगला आणि वस्तुनिष्ट वाटाघाटीकर्ता आहे, तुम्ही की पंतप्रधान मोदी? या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की,' पंतप्रधान मोदी हे खूपच चांगले वाटाघाटी करणारे आहेत. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही.